पैसाफंड प्राथमिक शाळेमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पैसाफंड प्राथमिक शाळेत दोन्ही विभागात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शिवरायांच्या व माँसाहेब जिजाऊ यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे लेझीम पथकाने दमदार स्वागत केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.अनिता लादे मॅडम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री दरेकर सर,

बालवाडी विभाग प्रमुख सौ. मनीषा नि-राळी मॅडम .यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी पोवाडा,गीत , नृत्य ,लेझीम,शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग , साहसी खेळ सादर करून उपस्थितांचे मन जिंकले काही विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत येऊन त्यांच्या पराक्रमाची झलक दाखविली. शालेय समिती अध्यक्ष श्री विनायक अभ्यंकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.अनिता लादे मॅडम आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांच्या शौर्य ,स्वाभिमान आणि न्यायप्रियतेबद्दल मार्गदर्शन केले .

Advertisement

शिक्षक मनोगत शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.दरेकर सर श्री बोंबले सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. ज्योती दुर्गे मॅडम ,सौ.शितल बोंबले मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्री.अमित चिंतल सर सौ.ज्योती डुंभरे मॅडम यांनी मानले

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ असा जयघोष करून वातावरण देशभक्ती नी भारावून टाकले कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरला. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page