मनपा शाळा क्र. 5 बी, कोंढवा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

SHARE NOW

पुणे (प्रतिनिधी)

मनपा शाळा क्र. 5 बी, कोंढवा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन तसेच मराठी भाषा दिन (काव्य वाचन) कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन वानवडी- रामटेकडी विभागाचे पर्यवेक्षक मा. अश्टूळ साहेब यांनी केले.

विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयक मॉडेल्स सादर करून विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सुंदर व भावपूर्ण काव्य वाचन सादर केले.

श्री.कैय्युम आत्तार सर,सौ.रेणुका स्वामी मॅडम व श्री.अमोल गायकवाड सर यांनी कविता सादर केल्या.त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

याप्रसंगी विकसित भारत ( Buildethon) 2025 यात यशस्वीपने सहभाग घेतलेल्या इ. 6 वी मधील विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला.

वानवडी- रामटेकडी विभागाचे पर्यवेक्षक मा. अश्टूळ साहेब यांनी आपल्या भाषणात विज्ञान व मातृभाषेचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. विज्ञानामुळे प्रगती साध्य होते, तर मराठी भाषा आपल्या संस्कृतीची ओळख जपते, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात विज्ञान दिन व मराठी भाषा दिन याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

वानवडी- रामटेकडी विभागाचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी मा. जयेश शेंडकर साहेब यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

 

याप्रसंगी प्रभारी मुख्याध्यापक सौ.नाजबीन खान मॅडम, मुख्याध्यापक सौ.प्रमोदिनी मगदूम मॅडम,प्रभारी मुख्याध्यापक सौ.मनिषा गडदे मॅडम, प्रभारी मुख्याध्यापक श्री.आयुब शेख सर तसेच मनपा शाळा क्र. 5 बी, 58 बी, 2 जी आणि मनपा शाळा पिसोळी शाळेचे शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन चे श्री.महेंद्र अहिरे सर यांनी मोलाचे सहकार्य केले

 

कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन श्री. कैय्युम आत्तार सर यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. समीर पठाण सर यांनी केले.

 

विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभागामुळे व शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page