वळंज विद्यालयाचा रौप्य महोत्सवी सोनपावलं अंक प्रकाशन सोहळा थाटात संपन्न.चांगल्या दर्जाचे शिक्षण व सुविधा देण्याचे काम वाळंज परिवाराने धरण भागात केलेले आहे. त्यातुन गोर गरीब जनतेची मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणली. 25 वर्षात हजारो मुलां मुलींनी शिक्षण घेतले. शाळेला रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त शुभेच्छा देतो. आमदार मा. शंकरभाऊ मांडेकर भोर राजगड मुळशी.

SHARE NOW

आंबवणे :

कोराईगड शिक्षण संस्था संचालित सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे ता. मुळशी जि. पुणे ही शाळा सह्याद्री च्या दुर्गम भागात सन 2001 या साली सुरु केली. आदिवासी शेतकरी कामगार ग्रामस्थांची मुले शिकावी हा उदात्त हेतू समोर ठेऊन संस्थापक अध्यक्ष मा नंदकुमार वाळंज यांनी शाळेची मुहूर्त मेढ केली. आज बघता बघता या शाळेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्त रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमास भोर राजगड मुळशीचे आमदार मा शंकरभाऊ मांडेकर,संस्थाचालक महामंडळाचे अध्यक्ष मा विजय कोलते, निवृत्त सहसचिव विभागीय शिक्षण मंडळ पुणे

लोणावळा एज्युकेशन संस्थेचे प्राचार्य डॉ नरेंद्र देशमुख, संपर्क संस्थेचे संस्थापक मा अमितकुमार बॅनर्जी,व्ही पी एस शाळा लोणावळा चे ट्रस्टी मा भगवान आंबेकर, मा. भाऊसाहेब कडू, देवले शाळेचे मुख्याध्यापक बापू पाटील , निवृत्त आर टी ओ मा. श्री हरिश्चन्द्र गडसिंग, मावळ वार्ता फाउंडेशन चे अध्यक्ष मा संजय अडसूळ, संस्था अध्यक्ष मा नंदकुमार वाळंज,संस्था खजिनदार श्री गणपत दादा मेंगडे आंबवणे गावाच्या माजी आदर्श सरपंच सौ वत्सलाताई वाळंज, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मा. मिलिंद दादा वाळंज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोणावळा महिला अध्यक्षा सौ उमाताई मेहता, राजेश मेहता,सौ मंगलताई गडसिंग ,धुळाभाऊ कोकरे,निवृत्त मुख्याध्यापक गोरख चौधरी,मुख्याध्यापक सुभाष मानकर, जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष मा पांडुरंग तिखे,स्वाती अरिंगले, नवनिता चटर्जी डॉ. रोहिणी गडसिंग,सौ शालिनी वाळंज, सौ मधुरा वाळंज मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

Advertisement

सरस्वतीचे पूजन करून दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते केले. विद्यार्थिनींनी पाऊण्यांचे गीतातून स्वागत केले. पाहुण्यांचा यथोचित सन्मान संस्थेच्या व शाळेच्या वतीने करण्यात आला. मुख्याध्यापक श्री भटू देवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून पंचवीस वर्षाच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. माजी विद्यार्थी पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग निरीक्षक ज्ञानेश्वर बावधने, वैष्णवी थोरवे, अक्षरा मेने सोहम जंगम या विद्यार्थ्यांची मनोगत मांडली. मा. शंकरभाऊ मांडेकर,

मा विजय कोलते, मा माणिक बांगर, मा. बापू तारे, किसन गोरे मा. नंदकुमार वाळंज आदी मान्यवरानी मनोगत व्यक्त केली. संस्थेचे व शाळेचे कौतुक केले.

आमदार मा. शंकरभाऊ मांडेकर यांच्या शुभ हस्ते “सोनपावलं ” अंकाचे प्रकाशन पार पडले. वाळंज बाबूजी यांनी माध्यमिक विद्यालय उभारले त्यामुळे गोर गरीब जनतेची मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणली असें मत मा. आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी मत व्यक्त केले.या प्रसंगी जि प शाळा आंबवणे मुळशी धरण प्रशाला पोमगाव, संपर्क ग्रामीण विद्याविकास केंद्र भांभर्डे येथील विद्यार्थ्यांनी नृत्या चा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

मा बापू तारे यांनी कार्यकमाचे सूत्रसंचालन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भटू देवरे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. या प्रसंगी माजी विद्यार्थी व बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वीते साठी रवींद्र सोनवणे, संजय कुलथे,बाळासाहेब खेडकर, राहुल आवळे, राजू तोंडे,शालिनी देवरे, महादेव खेडकर, संतोष दळवी, मंदा दळवी, अरुणा दळवी, पूजा मोढवे, सीमा दळवी, प्रगती वाळंज यांनी मेहनत घेतली.. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page