अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोकण कृती विभागाची धडक कारवाई.. मेफेड्रॉन या अंमली पदार्थासह ०१ आरोपी जेरबंद..
पुणे
दिनांक २/१०/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोकण कृती विभागाचे अधिकारी व अंमलदार यांनी पेट्रोलींग दरम्यान नवी मुंबई हद्दीत गस्त करीत असतांना मौजे जूहूनगर पाम बीच रोड वाशी या टिकाणी आले असता एक इसम संशयीत रित्या फिरत असल्याचे आढळून आले. सदर इसमाकडे चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव रमझान इमाम शेख वय-२५ वर्षे रा. नवी मुंबई जि. ठाणे असे कळवले त्यावेळी त्याची पंचा समक्ष घेण्यात आलेल्या अंगझडती दरम्यान सुमारे रु. २,८०,०००/- दोन लाख ऐंशी हजार रुपये किंमतीचा २८ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन (MD) हा अंमली पदार्थ व रोख रुपये ५,७२१/- पाच हजार सातशे एकवीस रुपये रोख रक्कम, व ओपो कंपनीचा मोबाईल मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून पंचासमक्ष मुद्देमाल जागीच सिल करुन वरील इसम नामे रमझान इमाम शेख वय- २५ वर्ष यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आला आहे. सदर आरोपीत याचे विरुद्ध ए.पी.एम.सी. पोलीस टाणे नवी मुंबई येथे गुन्हा रजि क्र.६३०/२०२५ एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २२ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यास अटक करण्यात आलेली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री. काळे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोकण कृती विभाग हे करीत आहेत.
सदरची कामगीरी ही अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स च्या विशेष पोलीस महानिरीक्षक, श्रीमती शारदा राऊत, पोलीस उपमहानिरीक्षक, श्री. प्रविण पाटील, पोलीस अधिक्षक, श्री. गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपधीक्षक श्री. रामचंद्र मोहीते, पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली घोरपडे, सपोनि श्री. उमेश भोसले, सपोनि श्री.यु.आर. काळे, पोउपनिरी श्री. सुहास तावडे, पोहवा/मोरे, पोहवा/रॉड्रीग्ज, पोहवा/जितेंद्र कांबळे, पोहया/जितेंद्र चव्हाण, पोशि/भोईर, पोशि/मांडवे, मोशि/कोल्हे, चालक पोशि/सागर नेरकर नेम. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोकण कृती विभाग यांनी उत्कृष्ट रित्या पार पडली.
या वेळी पोलीस अधिक्षक, श्री. गणेश इंगळे यांनी
सांगितले की,
महाराष्ट्र राज्यात मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शन व अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे नियंत्रण व देखरेखीखाली तसेच मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे अधिपत्याखाली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचा उददेश अंमली पदार्थ सेवनाची सवय लागलेल्या व्यक्तीचे पुर्नवर्सन करणे तसेच अंमली पदार्थाच्या दुष्णरिणामबाबत व्यापक जनजागृती करणे असा आहे.
महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही ठिकाणी अवैध अंमली पदार्थाची विक्री, साठा वाहतूक किंवा तस्करीच्या अनुशंगाने कोणतीही गोपनीय माहिती असल्यास अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, यांच्याकडे संपर्क साधावा. संबधीत माहिती देणारे व्यक्तीचे नाव व माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.






