आई एकविरा देवी देवस्थान कार्ला गडावर भाजपाकडून मंदिर परिसरात स्वछता मोहीम

SHARE NOW

कार्ला (मावळ):

आयोध्यात प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेकरीता आता काहीच दिवसांचा कालावधी बाकी आहे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी जी यांच्या आव्हानानुसार देशभर मंदिर व पूजा स्थळांचे स्वच्छता करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 19 जानेवारी रोजी मावळ तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सायली जितेंद्र बोत्रे यांच्या पुढाकाराने अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आई एकवीरा देवी मंदिरात देवीच्या मुख्य गाभारा व पूजा स्थान स्वच्छ करून देवीची मनोभावे पूजा करण्यात आली.

Advertisement

 

तसेच देवीचा कळस संपूर्णपणे पाण्याने धुऊन स्वच्छ करून गुलाब पाण्याने शुद्धीकरण करण्यात आले तसेच आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष शरद भाऊ बुट्टे पाटील मावळ तालुका निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे भाजपा तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ गुंड प्रांतिक सदस्य जितेंद्र बोत्रे महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष पूनम चौधरी लोणावळा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, जिल्हा सरचिटणीस संजय रौदल, लोकसभा समन्वय कविता हिंगे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम.

लोणावळा शहराध्यक्ष अरुण लाड एकवीरा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त नवनाथ देशमुख सागर देवकर विकास पडवळ प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले तालुका उपाध्यक्ष मधुकर पडवळ, जिल्हा सरचिटणीस सविता गावडे, तालुका सरचिटणीस अभिमन्यू शिंदे, सचिन येवले, दत्तात्रय पडवळ, मंगेश देशमुख, अमोल भेगडे, किसन येवले, गणेश देशमुख, एकनाथ पोटफोडे, सदाशिव देशमुख, मच्छिंद्र केदारी, अरुण भानुसघरे, हरी भक्त पारायण नंदकुमार महाराज शेटे व इतर सहकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page