भाजपा देहू–देहूरोडचा पुढाकार – नवरात्रापूर्वी रस्ते दुरुस्ती व स्वच्छता मोहिमेला गती
देहूरोड :

देहूरोड परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे व स्वच्छतेअभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः वॉर्ड क्र. १ मधील स्मशानभूमीचा रस्ता, भेगडेवाडी स्टेशन–शेलारवाडी रस्ता आणि शितळानगर नं. १ चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमान – देहूरोड शिवाजी विद्यालय समोरील रस्ता हे रस्ते खड्डेमय झाल्याने वाहतुकीसह पादचाऱ्यांना त्रास होत होता.
या पार्श्वभूमीवर भाजपा देहू–देहूरोड शहर मंडळाच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डच्या CEO मॅडम यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनानंतर तातडीने जीएसबी मटेरियल टाकून खड्डे बुजवण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले, ज्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
—
नवरात्रापूर्वी स्वच्छतेवर भर
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर CEO मॅडम यांनी विशेष सूचना देत शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि देवीची स्थापना होणारे परिसर येथे खालील कामांना गती देण्याचे आदेश दिले आहेत –
ग्रास कटिंग (झाडाझुडपांची छाटणी)
स्वच्छता मोहीम
पावडर फवारणी
फॉगिंग
औषध फवारणी
तसेच, पुढील आठवड्यात CEO मॅडम प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यावर जाऊन शहरातील समस्यांचा आढावा घेणार असल्याची माहिती देण्यात आली.
—
निवेदन देताना उपस्थित मान्यवर:
या निवेदनावेळी भाजपा व विविध सामाजिक संघटनांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये प्रमुख मान्यवर –
श्री. रघुवीर उद्धवराव शेलार – अध्यक्ष, श्री क्षेत्र देहू-देहूरोड शहर मंडळ, माजी नगरसेवक देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड
श्री. रवींद्र (लहू मामा) शेलार – माजी अध्यक्ष, भाजपा देहूरोड शहर
विशाल खंडेलवाल – माजी अध्यक्ष, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड
बाळासाहेब शेलार – उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा
एम. डी. चौधरी – अध्यक्ष, मानवाधिकार महाराष्ट्र राज्य
बाबू हिरेमेटकर – उपाध्यक्ष, मानवाधिकार महाराष्ट्र राज्य
राकेश कुंचीकर – अध्यक्ष, भटके विमुक्त शहर संघटना
उमाशंकर सिंग – सरचिटणीस, श्री क्षेत्र देहू-देहूरोड मंडळ
विनायकराव भेगडे, कृष्णा अनमोल, बाळासाहेब शिळवणे, रमेश कुंचीकर, दिनेश बालघरे, बाबू रामलू कोळी यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.






