खुटबाव ता. दौंड ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , बही:शाल शिक्षण मंडळ, ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष, भैरवनाथ शिक्षण संस्थेचे, पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे आयोजन.
दौंड :
खुटबाव ता. दौंड ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , बही:शाल शिक्षण मंडळ, ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष, भैरवनाथ शिक्षण संस्थेचे, पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे आयोजन बुधवार दि. 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2023 या कालावधीत पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयात आयोजन केले होते.यावेळी संस्थेचे खजिनदार श्री.अरुण थोरात सर्व,सचिव श्री. सूर्यकांत खैरे ,उपाध्यक्ष श्री.भाऊसाहेब ढमढरे व सर्व प्राध्यापक उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन करून व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ.नितीन मोटे ,(शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय सिंहगड रोड पुणे,) यांनी गुंफले.आजची पिढी दशा आणि दिशा हीच खरी पालकांची समस्या विषयावर महापुरुषांचे दाखले देऊन मार्मिक भाष्य करत बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी इतरांचे विचार न करता अनुकरण करण्यापेक्षा स्वतःचे आत्मपरीक्षण करून स्वतःचे भविष्य स्वतः घडवावे, स्वामी विवेकानंदा सारख्या उत्तम चरित्र सगळ्यांनी स्वतः आत्मसात करा.विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आपले ध्येय निश्चित करावे आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करावेत. जगात आई-वडिलांशिवाय दुसरा कोणताही श्रेष्ठ गुरु नाही म्हणून आई वडिलांना कधी अंतर देऊ नका आणि आपले संस्कार अंगीकारत ते टिकवण आपलं कर्तव्य आहे कसे हे समजावले.

व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ धनंजय भिसे (रयत शिक्षण संस्थेचे,एस.एम. जोशी कॉलेज,हडपसर) हे ओवणार आहेत त्यासाठी विषय आहे भारतीय परंपरा आणि आजचे युग .तिसरे पुष्प डॉ.प्रकाश पांढरमिशे
(संत ज्ञानेश्वर कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपरी चिंचवड)
- मोबाईल आणि आजची तरुण पिढी या विषयावर मागदर्शन करणार आहे.आजच्या प्रसंगी पत्रकार डॉ.प्रकाश शेलार सर देखील उपस्थित होते.केंद्रवाह(बही:शाल शिक्षण मंडळ ) प्रा.नानासाहेब टेंगले यांनी प्राचार्य डॉ.रेखा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रा.डॉ. सुनीता बनकर /म्हेत्रे यांनी मान्यवरांचे आभारप्रदर्शन केले.






