विसापूर किल्ल्याकडे जात असताना दरीत पडून तरुणाचा मृत्यू

SHARE NOW

भाजे : विसापूर किल्ल्याकडे पर्यटनासाठी जात असताना भाजे धबधब्याजवळ पाय घसरून एक तरुण दरीत पडला. गंभीर जखमा मुळे सदरील तरुणाचा मृत्यू झाला. अब्राहम शिंसे असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघाताची माहिती मिळताच लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली. अथक प्रयत्नांनी दरीत पडलेल्या अब्राहम याचा मृतदेह शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने शोधून काढला. सागर कुंभार. सागर दळवी. मोरेश्वर मांडेकर. यश मसने. राजेंद्र कडू. पिंटू मानकर. ओंकार पडवळ. अशोक उंबरे. यांनी रेस्क्यू पथकात सहभाग घेतला. या संदर्भात बोलताना शिवदुर्ग पथकाचे सुनील गायकवाड म्हणाले की पावसाळ्यात या परिसरात निसरडे दगड. चिखल. आणि पाय घसरून पडण्याचा मोठा धोका असतो. प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येत असतात असे असताना पर्यटक नियम झुगारून धोकादायक मार्गावर जातात. त्यामुळे अशा घटना सातत्याने घडत आहे. प्रशासनाने पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेताना स्वतःची व इतरांची सुरक्षा लक्षात घेण्याचे आवाहन केले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page