वडेश्वरमध्ये आधार केंद्राचा शुभारंभ; अंदर मावळातील नागरिकांना मोठा दिलासा!
वडेश्वर :

वडेश्वर (मावळ) येथे आज अंदर मावळातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आधार केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. पुणे जिल्हा परिषद सदस्य मा. अनंता दादा पावशे यांच्या शुभहस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
मावळचे लोकप्रिय खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख राजूभाऊ खांडभोर यांच्या प्रयत्नातून हे आधार केंद्र सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना आधार कार्ड संदर्भातील विविध अडचणी सोडवण्यासाठी या केंद्राची अत्यंत गरज होती. ही गरज ओळखून वडेश्वर येथे केंद्र उभारण्यात आले असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजूभाऊ खांडभोर, आदर्श सरपंच शांताराम लष्करी, संजय गांधी निराधार समिती सदस्य शंकर हेमाडे, चेअरमन मधुकर तुपके, चेअरमन मारुतीराव खांडभोर, उपसरपंच ज्ञानेश्वर जगताप, उपसरपंच शिवराम शिंदे, सदस्य सौ. मनीषा दरेकर, माजी सरपंच संतोषी ताई खांडभोर, अनंता हेमाडे, अंगणवाडी अधिकारी भागवत मॅडम, विक्रम हेमाडे तसेच इतर आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहात पार पडत सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाला.






