वडेश्वर व वाहणगाव शाळांमध्ये टाटा पॉवरतर्फे 10वी-12वी विद्यार्थ्यांना नवनीत अपेक्षित 21 संचांचे मोफत वाटप

SHARE NOW

आंदर मावळ :

 

वडेश्वर शासकीय आदिवासी आश्रम शाळा व श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय वाहणगाव येथे 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेची प्रभावी तयारी करता यावी म्हणून टाटा पॉवर कंपनीतर्फे नवनीत अपेक्षित 21 संचांचे मोफत वाटप करण्यात आले.

 

या शैक्षणिक उपक्रमाची सुरूवात 2017 सालापासून होत असून टाटा पॉवरच्या माध्यमातून शिवसेना जिल्हा प्रमुख श्री राजेश खांडभोर सातत्याने अंदर मावळ परिसरातील वडेश्वर, वाहणगाव, माळेगाव आदी शाळांमधील विद्यार्थ्यांना हे संच उपलब्ध करून देत आहेत.

Advertisement

 

यावेळी वडेश्वर शासकीय आश्रम शाळेत टाटा पॉवरचे मुख्य अधिकारी श्री फुलंद्रर सुर्णेदर, टाटा पॉवर लोणावळा विभागाचे अधिकारी श्री मनोहर म्हात्रे, मा. सरपंच शांतराम लष्करी, मा. सरपंच बबनराव हेमाडे, मा. सरपंच सौ. मुक्ताबाई उंबरेकर, मा. उपसरपंच संदीप गराडे, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष संतोष गभाले, गणेश मोरमारे, वाहणगाव शालेय समिती अध्यक्ष काळुराम वाडेकर मुख्याध्यापक विनय कसबे सह इत्यादी उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page