स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न
तळेगाव दाभाडे :

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य व प्रेरणादायी शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला. संपूर्ण परिसर देशभक्तीपर वातावरणाने भारावून गेला होता.
या कार्यक्रमास श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री मिलिंद शेलार सर सहसचिव व शालेय समिती अध्यक्षा सौ. रजनीगंधा खांडगे मॅडम, , मुख्याध्यापिका सौ रेणू शर्मा मॅडम, पर्यवेक्षक श्री सिद्धेश्वर सोनवणे सर, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिवाजी महाराजांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली.
त्यानंतर विद्यालयाच्या संगीत शिक्षिका सौ अपेक्षा पाटील मॅडम व विद्यार्थिनी यांनी राज्य गीत व शिवाजी महाराजांचा पाळणा सादर करण्यात आला. पाळणागीतामुळे वातावरणात भक्तीभाव आणि अभिमानाची भावना निर्माण झाली. कार्यक्रमात देशभक्तीची उंची वाढवली.
विद्यालयाच्या शिक्षिका सौ अश्विनी जोशी यांनी शिवाजी महाराजांवर आधारित प्रेरणादायी सुविचार मांडले .
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ रेणू शर्मा यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
विद्यालयातील इ. ८ वीची विद्यार्थिनी कु.शर्वरी गायकवाड हिने आपल्या मनोगतातून शिवरायांच्या शौर्य, स्वराज्य स्थापनेची जिद्द, न्यायप्रियता आणि दूरदृष्टी यांचा प्रभावी उल्लेख केला.
विद्यालयातील इ.५)वी तील विद्यार्थी रुद्रप्रताप बोराडे याने शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवगाथा सादर केली. “शिवरायांचा आदर्श आमच्या कृतीतून जिवंत ठेवू,” अशी भावना व्यक्त केली.
विद्यालयाच्या शिक्षिका सौ किरण पाटील मॅडम यांनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना स्वाभिमान, शिस्त आणि राष्ट्रप्रेम जोपासण्याचे आवाहन केले.
इ. ९)वी तील सृष्टी वीर या विद्यार्थिनीने सादर केलेला जोशपूर्ण पोवाडा उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवत गाजला.
विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले “गड-किल्ल्यांची स्वच्छता” हे सामाजिक संदेश देणारे नाटक विशेष ठरले. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत आणली.
इयत्ता दहावीचा विद्यार्थी विवेक ढेंगळे याने दिलेली शिवगर्जना कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली.
मुख्याध्यापिका सौ .रेणू शर्मा मॅडम यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे धैर्य, नेतृत्व आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे आचरणात रूपांतर करावे.”
प्रमुख पाहुण्या सौ .रजनीगंधा खांडगे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून शिवरायांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी चिकाटी ठेवण्याचे आवाहन केले.
देशभक्ती, संस्कार आणि प्रेरणादायी विचारांनी समृद्ध असा हा शिवजयंती सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. या कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयाची विद्यार्थिनी कु. स्वामिनी धोत्रे यांनी केले.
याप्रसंगी श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष खांडगे सर, संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब उऱ्हे ,सचिव श्री मिलिंद शेलार ,शालेय समिती अध्यक्षा व सहसचिव सौ रजनीगंधा खांडगे , कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे , यांनी या कार्यक्रमाची कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






