*शांतता पुणेकर वाचत आहेत* या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे इंद्रायणी महाविद्यालयात आयोजन.*
भारत सरकारच्या राष्ट्रीय पुस्तक न्यासा तर्फे पुण्यात दिनांक 16 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2023 च्या दरम्यान ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आपल्या शहरातून आणि राज्यभरातून लाखो विद्यार्थी हा वाचनाचा आनंद घेतील तसेच यामध्ये पुस्तक प्रदर्शनाबरोबर चर्चासत्रे साहित्यिकांच्या मुलाखती आणि वाचन संस्कृतीचा विकास घडविणारे कार्यक्रम यावेळी घेण्यात येणार आहे याच उपक्रमाची पूर्वतयारी म्हणून एक अनोखे आयोजन शांतता पुणेकर वाचत आहे हे केले आहे.
दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी दुपारी बारा ते एक या वेळेत इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे इंद्रायणी महाविद्यालय शांतता पुणेकर वाचत आहेत या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास काकडे, सचिव चंद्रकांत शेटे ,संस्थेच्या सदस्या निरूपा कनिटकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे हे उपस्थित होते याप्रसंगी जेष्ठ कवी पुरुषोत्तम सदाफुले, तसेच शाहीर प्रभाकर वाघोले यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व विशद केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन केले मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळेस उपस्थित होते.







