*सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल एकपात्री अभिनय स्पर्धा व फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात संपन्न*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे

सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एकपात्री अभिनय स्पर्धा व फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडली. कार्यक्रम मुख्याध्यापिका सौ. रंजीता थंपी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या प्रेरणेमुळे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सहभाग घेतला.

एकांकिका स्पर्धेचे संयोजक म्हणून सौ. हेमा कोळेकर व सौ. कीर्ती कुलकर्णी यासहशिक्षकांनी उत्तम नियोजन केले. या स्पर्धेचे परीक्षण सौ. स्मिता राहाळकर तसेच मुख्याध्यापिका सौ. रंजीता थंपी यांनी केले. विद्यार्थ्यांनी स्वच्छता , पर्यावरण संरक्षण ,स्त्रीभ्रूणहत्या अशा सामाजिक विषयांवर प्रभावी नाट्य सादर करून समाजजागृतीचा संदेश दिला.

फॅन्सी ड्रेस स्पर्धा देखील उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे विषय “टाकाऊपासून टिकाऊ” आणि “स्वच्छता” असे होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

Advertisement

“टाकाऊपासून टिकाऊ” या विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी टाकून देण्यासारख्या वस्तूंमधून तयार केलेली सुंदर व उपयुक्त वस्त्रे परिधान केली. प्लास्टिकच्या बाटल्या, जुने वर्तमानपत्र, कागद, डबे यांचा वापर करून त्यांनी सर्जनशील वेशभूषा साकारली. यामधून पर्यावरण संरक्षण व पुनर्वापराचा संदेश देण्यात आला.

“स्वच्छता” या विषयावर विद्यार्थ्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी स्वच्छतेचा संदेश देत समाजात स्वच्छता राखण्याचे महत्त्व सांगितले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि सामाजिक जाणीवही विकसित झाली.फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे संयोजक सौ. नेहा घुले व सौ. आरती जाधव होत्या. या स्पर्धेचे परीक्षण सौ. रंजीता थंपी व सौ. निकिता पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषांमधून आपले कौशल्य सादर केले.

या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला व त्यांचा आत्मविश्वास वाढला. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page