सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलचे विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश

SHARE NOW

तळेगाव दाभाडे

अलीकडे आयोजित करण्यात आलेल्या विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे.

‘कलापिनी’ आयोजित चित्रकला स्पर्धेत मोठ्या गटातून श्रुती प्रतिक पाटील हिने द्वितीय क्रमांक पटकावला, तर समर्थ समाधान सांडगे यानेही उत्कृष्ट कामगिरी करत आपली छाप पाडली.

नाट्यवाचन स्पर्धेत शाळेने ४ वैयक्तिक व १ गट पारितोषिक मिळवून अभिमानास्पद यश संपादन केले. उत्कृष्ट लेखन कौस्तुभ ओक सर यांनी द्वितीय क्रमांक मिळवून वाचिक अभिनयात रविंद्र घोजगे सर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक, तर ऋतुजा सावंत शिक्षिकेने वाचिक अभिनयात प्रथम क्रमांक पटकावला.

Advertisement

शालेय गटातून वाचिक अभिनय स्पर्धेत ऋग्वेद अराणके इ. ९वी याने तृतीय क्रमांक मिळवून कौतुकास्पद कामगिरी केली.

गणेश मोफत वाचनालय आयोजित वक्तृत्व स्पर्धेत चिन्मय फल्ले याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या सर्व यशामागे विद्यार्थ्यांचे परिश्रम, पालकांचे सहकार्य यांचे विशेष मार्गदर्शन मोलाचे ठरले.

या सर्व यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page