रोलर स्केटिंग स्पर्धेत विवान गांधीचे यश;गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
तळेगाव दाभाडे: बेळगाव येथे नुकत्याच झालेल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत विवान धवल गांधी आणि टीमने तब्बल ५३ तास अखंड स्केटिंग करून
उल्लेखनीय यश संपादन केले. विवान गांधी हा माउंट सेंट ॲन स्कूलचा विद्यार्थी असून तो सहावीत शिकत आहे.
Advertisement
दोन चाकांवर सर्वात वेगवान १०० मीटर रोलर स्केटिंग पूर्ण करून आणखी एक विक्रम या चिमुकल्या क्रीडापटूने आपल्या नावावर नोंदवला.राहुल सुरेश लोंबार यांचे त्याला मार्गदर्शन मिळाले.या दुहेरी यशाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली असून,
विवान गांधी आणि टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.






