पुण्यात मानवी हक्क दिन विविध कार्यक्रमाने साजरा

SHARE NOW

पैशां अभावी कोणताही गरीब व्यक्ती न्यायापासून वंचीत रहाणार नाही . न्यायाधीश सोनल पाटील, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त ‘जागर मानवी हक्काचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पोलीस तक्रार प्राधिकरण अध्यक्ष आर व्ही जटाळे (निवृत्त न्याधीस सत्र न्यायालय), न्यायाधीश सोनल पाटील, सचिव -जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सुरेंद्रकुमार मानकोसकर (जीएसटी आयुक्त), समाज कल्याण सहायक आयुक्त संतोष जाधव, श्याम आगरवाल संपादक, दैनिक आज का आनंद, तहसीलदार मदन जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात उपस्थित जनतेला पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश सोनल पाटील यांनी मार्गदर्शन केले. आर्थिकदृष्ट्या मागास वंचित घटकांच्या न्यायासाठी विधी सहाय्य देऊन त्यांच्या मानवी हक्कांचे रक्षण केले जाते. पैशाच्या अभावी कोणीही न्यायापासून वंचित राहू नये पीडितांनी विधी सह्यासाठी प्राधिकरणाशी संपर्क करावा असे आवाहन केले. विधी सेवा प्राधिकरणाकडून देण्यात येत असलेल्या विधी साह्य याबाबत त्यांनी माहिती दिली.या

कार्यक्रमात न्यायाधीश जटाळे म्हणाले की, “मानवी हक्काचे रक्षक असलेल्या न्याय व्यवस्थेने संवेदनशील मानवी हक्क उल्लंघनाची प्रकरणे हाताळणे गरजेचे आहे.” पोलीस प्राधिकरण हे लोकांच्या मानवी हक्काचे रक्षण करणारी यंत्रणा आहे याची माहिती दिली.

Advertisement

या कार्यक्रमात दैनिक आज का आनंद चे संपादक यांनी ‘वक्त के कागरपर आवो एक बात नयी लिखते हे बहुतोने लिखा हें कूछ गलत गलत हम कुछ नया लिखते हैं’ म्हणत मानवी हक्कांवर आपली भूमिका मांडली. कार्यक्रमात ॲड. असीम सरोदे यांनी मानवी हक्क संरक्षणाच्या यंत्रणा जर त्यांच्या अधिकाराचा वापरच करणार नसतील तर त्या बंद करून मानवी हक्काचे स्पेशल कोर्ट करावेत अशी भूमिका मांडली. या कार्यक्रमात समाजात विविध क्षेत्रातून मानवतेच्या दृष्टीने सामाजिक कार्य करीत असलेल्या व्यक्ती, संस्था, संघटना यांच्या कार्याला अधिक स्फूर्तीबळ मिळावे या हेतूने त्यांना मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात करण्यात आले.

या कार्यक्रमात मानवाधिकार पुरस्कार (शैक्षणिक क्षेत्रातून) मा. संजय चोरडिया, (विधीसेवा) – ॲड. रशीद सिद्धीकी, (कामगार क्षेत्र), सुरेश केसरकर (कोल्हापूर), (प्रशासकीय सेवा) पी. बी. माळी. (सामाजिक क्षेत्र) – शमीभा पाटील, (उद्योग क्षेत्रातून) रविराज धायगुडे यांना मानवाधिकार पुरस्काराने गौरविण्यात आले.

विशेष कार्य मानवाधिकार पुरस्काराने संविधान प्रचारक लोक चळवळ, दिलासा संस्था पिंपरी चिंचवड पुणे, यांचा सन्मान झाला तर विशेष कार्य सन्मान पुरस्कार, संविधान सखी संघटन मुंबई, अखिल भारतीय महिला शक्ती सेना पुणे, राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन, संघटित कष्टकरी कामगार संघटना बार्शी, ग्राहक हक्क संरक्षण समिती पुणे, महिला बचत गट पुणे, घर बचाओ घर बनवून आंदोलन संघटन मुंबई, सहजीवन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बार्शी या संस्थांच्या सामाजिक कार्याला मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या वतीने विशेष कार्य सन्मान पुरस्काराने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात करण्यात आले. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, यांनी दिली आहे. कार्यक्रमात विकास कुचेकर लिखित ‘रक्षक मानवी हक्काचा’ पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. याबाबत आकाश भोसले यांनी भूमिका मांडली. संचालक आण्णा जोगदंड, मुरलीधर दळवी, गजानन धाराशिवकर, मनीष देशपांडे, हरिभाऊ मंजुळे यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page