दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर, घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस केले जेरबंद,
पुणे :
दिनांक ०२/०२/२०२६ ते दि. ०६/०२/२०२६ रोजीचे दरम्यान अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांचे रहाते घराचा कड़ी कोयंडा कशानेतरी उचकटुन घरातील सोने, चांदी व रोख रक्कम असा एकुण रु.२४,४८,७५०/- किं. चा मुददेमाल चोरीस गेला आहे. सदरबाबत येवलेवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं.८९/२०२६ भारतीय न्याय संहीता सन २०२३ चे कलम ३०५, ३३१ (३), ३३१ (४), ३ (५) गुन्हा दाखल आहे.
दिनांक ११/०१/२०२६ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार परेश सावंत व पोलीस अंमलदार विनायक येवले यांना गोपनीय बातमीदार व तांत्रीक विश्लेषणा व्दारे आरोपी नामे कुमार रामचंद्र ठाकर वय ३८ वर्षे रा. फ्लॅट नं.१४, अशोक अपार्टमेंट लेन नं. ३ दत्तनगर आंबेगांव बु” पुणे हा पीएमपीएमएल बसडेपो कात्रज पुणे येथे मिळुन आला. त्याचेकडे नमुद गुन्हयातील एकुण ११५ ग्रॅम ७०० मिली वजनाचे सोन्याचे दागीने, एकुण ११२ ग्रॅम ८०० मिली वजनाचे चांदीचे दागीने तसेच रु.३५,०००/- रोख रक्कम असा एकुण १६,६५,७००/- किमतीचा मुददेमाल मिळुन आला. नमुद आरोपी याने सदर गुन्हयात त्याचा साथीदार याचेसह केलेचे निष्पन्न झाले.
सदर कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे ३ श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री दत्ताराम बागवे, सहायक पोलीस निरीक्षक सी.बी.बेरड, पोलीस उपनिरीक्षक एस. जे. तानवडे, पोलीस अंमलदार कैलास चव्हाण, राजु पुणेकर, परेश सावंत, प्रफुल्ल मोरे, विनायक येवले, विक्रांत सासवडकर यांनी उघडकीस आणला आहे.






