पक्ष्यांच्या विष्टेचा होतोय नागरिकांना त्रास.. पहाटेच्या वेळी स्वछता करण्याची नागरिकांची मागणी..
कात्रज (प्रतिनिधी )
कात्रज येथील श्रीमंत नानासाहेब पेशवे जनशयावर सकाळच्या पहाटेच्या पाच वाजल्यापासून नागरिकांची व्यायामासाठी धावपळ सुरू असते. गेल्या अनेक वर्षापासून हा तलाव नागरिकांसाठी “आरोग्यदूत” ठरलेला आहे.
छत्रपती संभाजी राजांच्या दर्शनाने नागरिक पहाटेच्या व्यायामाला सुरुवात करतात, परंतु काही दिवसापासून परिसरातील उद्यानाची साफसफाई,स्वच्छता याकडे मात्र उद्यान कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. पहाटेच्या वेळी नागरिकांना फिरताना पक्षांच्या विष्टेचा प्रचंड घाण वास येत असून यामुळे फिरण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. पक्षांची विस्टा मोठ्या प्रमाणावर असल्याने ती व्यायाम करताना पायाला चिकटते व तिचा दुर्गंध मोठ्या प्रमाणावर येत असल्याने पहाटेच्या वेळी व्यायाम करणाऱ्या परिसरातील नागरिकांसाठी ही डोकेदुखी ठरत आहे.
संपूर्ण वॉकिंग ट्रॅक स्वच्छ करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
आम्ही गेले अनेक वर्षापासून पहाटे व्यायामासाठी नियमितपणे येत असतो. पहाटेच्या वेळी पक्षांनी वॉकिंग ट्रॅक वर मोठ्या प्रमाणावर घाण केलेली असते. त्यामुळे सकाळच्या वेळी वॉकिंग करताना ती सर्व घाण पायाला चिकटले जाते त्यामुळे दुर्गंधीचा प्रचंड त्रास सर्वच नागरिकांना सहन करावा लागतो.मनपा प्रशासनाने तत्काळ एखादा स्वच्छता कर्मचारी नियुक्त केल्यास नागरिकांना होणारा पक्ष्यांच्या विष्ठेचा त्रास आणि दुर्गंधीचा त्रास निश्चितपणे कमी होईल.
रविंद्र ढाकणे
स्थानिक नागरिक.






