तळेगाव दाभाडे नगरपरिषद शाळेत स्काऊट गाईड मेळावा उत्साहात संपन्न

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

Advertisement

लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांचा जन्मदिवस(चिंतन दिवस) निमित्त सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक चार व गणेश विद्यामंदिर प्राथमिक शाळा क्रमांक सात यांच्या संयुक्त विद्यमाने कब-बुलबुल ,स्काऊट -गाईड मेळावा घेण्यात आला. त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .हा मेळावा शाळा क्रमांक सातच्या ठाकरवाडी गणपती माळच्या प्रांगणात संपन्न झाला.मेळाव्याचे उद्घाटन व ध्वजारोहण नगरपरिषद शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी माननीय श्रीमती अनिता वैद्यमॅडम, विद्यमान नगरसेविका शोभाताई परदेशी व सोनाली ताई दरेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी तळेगाव दाभाडे तळेगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष माननीय श्री संतोष दादा दाभाडे, स्काऊट मार्गदर्शक श्री विजयकुमार जोरी सर पत्रकार श्री. आमिर खान व श्री. सुरेश शिंदे उपस्थित होते त्याचप्रमाणे सर्व शाळाचे मुख्याध्यापक अनिता तिकोने, केशव चिमटे, संध्या कुलकर्णी, शिक्षण विभागाचे कार्यालयीन प्रमुख मयुरेश मुळे त्याचप्रमाणे सर्व शिक्षक उपस्थित होते. सकाळी 10 ते 4 या वेळात ध्वजारोहण, मानवंदना, संचलन, वृक्षारोपण ,संगीत कवायत, मनोरे ,विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रथमोपचार मार्गदर्शन इत्यादी उपक्रम यावेळी घेण्यात आले. शेकोटीच्या उपक्रमाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .यावेळी स्काऊट गाईडचे मार्गदर्शक राजेंद्र शिंदे, पूजा सपकाळे, धनश्री चौधरी, प्राची लोमटे, अनिता सोमवंशी, विष्णू महाजन, रेखा विधाते ,सागर साबळे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. ताहेरा बासडे, सोनाली घाटे, गणेश ठाकरे, वैशाली साबळे, धीरज भालेराव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन सौ. निकिता शितोळे व आभार राजेंद्र शिंदे यांनी केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page