MKCL हॅट्रिक अवॉर्ड विनर लोटस कम्प्युटर
तळेगाव दाभाडे :
एम.के.सी.एल च्या 18 नोव्हेंबर 2025 ला पार पडलेल्या वार्षिक सभेमध्ये वर्ष 2025 साठी क्लिक कोर्सेस आणि महाराष्ट्र ओलंपियाड मुव्हमेंट एक्झाम साठी लोटस कम्प्युटरला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी लोटस कम्प्युटरचे सर्वेसर्वा संदीप मगर यांनी सांगितले की लोटस कम्प्युटर हे एम.के.सी.एल.च्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी होणारे सेंटर आहे. यासाठी आर.एल.सी, एल.एल.सी, एस.बी.यु यांचे सहकार्य नेहमीच असते. लोटस कम्प्युटर हे नेहमीच विद्यार्थ्यांसाठी झटणारे सेंटर आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक डिजिटल साक्षरता, सक्षमता करण्याचे काम लोटस कम्प्युटरने मावळ तालुक्यामध्ये केलेले आहे.
10 वाजता एम.के.सीए.ल ची मिटिंग सुरू झाली त्यामध्ये जी.एम अतुल पतोडी , अमित रानडे, आर.एल.सी कॉर्डिनेटर विश्वजीत उत्तरवार या सर्वांचे प्रेझेंटेशन झाले. भविष्यातील टेक्नॉलॉजी आणि आपण यांचा संयोग कसा करता येईल याचे अतिशय सुंदर प्रेझेंटेशन झाले.
एम.के.सी.एल.चे मेंटोर विवेक सावंत सरांनी प्रत्येक बाबतीत त्रिसूत्रीच्या माध्यमातून सर्वांना मार्गदर्शन केले.
सर्व सेंटर्स नी चविष्ट भोजनाचा आनंद घेतला.
लोटस कम्प्युटरला मिळालेल्या या अवॉर्ड बद्दल लोटस कम्प्युटरच्या नेटवर्कमधील सर्व बारा जणांच्या टीमनी एकच जल्लोष केला. आनंदी वातावरणामध्ये एम.के.सी.एल च्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता झाली.






