सामाजिक बांधिलकी व पर्यावरण संवर्धन या बी.एड. कोर्स व इनरव्हील क्लब मावळ शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रौढ मतिमंदांची काळजी घेणारी निवासी संस्था तळेगाव दाभाडे आंबी येथे भेट देऊन जागविली माणुसकी

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

तळेगाव दाभाडे येथील स्नेहवर्धक मंडळ संचलित बी.एड. महाविद्याल व इनरव्हील क्लब मावळ शक्ती यांच्या वतीने विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव ठेवत नवक्षितीज या मतिमंद मुलांच्या संस्थेला भेट देऊन माणुसकीचा जागर केला.

शुक्रवारी दिनांक ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी बी.एड. विभागाच्या वतीने मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे आंबी मावळ येथे द हेरिटेज एज्युकेशन सोसायटी आंबी येथे “नवक्षितिज” या बौद्धिक अपंगत्व असलेल्या प्रौढांसाठीच्या निवासी केंद्रास भेट देण्यात आली. शिक्षकांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते न राहता सामाजिक प्रश्न, विशेष गरजा असलेल्या मुलांचे जीवन आणि समावेशक शिक्षणाची जाणीव ठेवावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा उपक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पल्लवी वर्तक, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राध्यापक सौ. हेमा देशमुख, इनरव्हील मावळ शक्तीच्या अध्यक्षा सौ. ज्योती राजिवडी यांच्या संकल्पनेतून उपक्रम राबविण्यात आला. ह्या मधे दिवसभराचे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी १० वाजता महाविद्यालयाचे विद्यार्थी, इनरव्हील क्लब मावळ शक्तीच्या मेंबर व प्राध्यापक संस्थेत पोहोचले. संस्थेचे संचालक श्री.नितीन गायकवाड व सौ.पूजा गायकवाड यांनी संस्थेचे कार्य, तसेच मतिमंद मुलांच्या संगोपनात येणाऱ्या आव्हानांची व विद्यार्थ्यांच्या दिनचर्येची माहिती दिली.यानंतर विद्यार्थ्यांनी मुलांसोबत संवाद साधत विविध उपक्रम राबविले. त्यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले.

विद्यार्थ्यांनी “पाणी वाचवा – पाणी जिरवा” या विषयावर चित्रकला कार्यशाळा व माहिती तक्त्यांचे सादरीकरण केले. यासोबतच बी.एड. विद्यार्थ्यांच्या वतीने मुलांना धान्य स्वरूपात मदत करण्यात आली.

Advertisement

परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले त्यामध्ये चाफा, उंबर, वड अशा हवा शुद्धीकरणासाठी उपयुक्त झाड लावण्यात आली. भेटीमुळे भावी शिक्षकांना समावेशक शिक्षण (Inclusive Education) या संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

“या मुलांकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन बदलला असून, त्यांच्यातील जिद्द आम्हाला खूप काही शिकवून गेली.सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनाकडून खूप तक्रारी असतात त्यांनी एकदा इथे अवश्य भेट द्यावी म्हणजे जीवन जगण्याचा खरा अर्थ समजेल ” अशी भावना प्राध्यापक सौ. हेमा देशमुख यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रणिता कोल्हापूरे यांनी केले, तर सौ. कोमल राक्षे यांनी प्रभावी शब्दांत आभार मानले त्यावेळी सर्व उपस्थित मान्यवर भावुक झाले.कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांना त्या संस्थेतील मुलांनी स्वतः रुजवलेली रोपटे देऊन तसेच सर्व बी.एड विद्यार्थ्यांना स्वतः तयार केलेली अगरबत्ती भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली.“अशा भेटींमुळे या मुलांना समाजाचा एक भाग असल्याचा आनंद मिळतो,” असे मत इनरव्हील क्लब मावळ शक्ती अध्यक्षा सौ.ज्योती राजीवडे व सामाजिक कार्यकर्ते श्री.भरत नाना राजीवडे यांनी व्यक्त केले.

यावेळी इनरव्हील क्लब मावळ शक्तीच्या सेक्रेटरी सुरैय्या शेख, एडिटर सौ.छाया साळुंखे, एक्झिटिव्ह मेंबर कु. अश्विनी बेंद्रे यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांमध्ये हर्षा थरवाणी यांनी सादर केलेला पाणी संवर्धन तक्ता संदेशपर ठरला, तर नेहा शर्मा, अनुराधा कालेकर, सिद्धी गवळी, स्नेहल काकडे, तुकाराम राक्षे व मनोज देशपांडे यांनी राबविलेले चित्रकला आयोजन व परिसर स्वच्छता अभियान उल्लेखनीय ठरले. कार्यक्रमाप्रसंगी संस्थेतील शिक्षक वृंद कर्मचारी वर्ग मुलं उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page