“इंद्रधनु:जल्लोष तरुणाईचा”या युवा महोत्सवाचा शानदार समारोप.

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

Advertisement

इंद्रायणी विद्या मंदिर आयोजित “इंद्रधनु: जल्लोष तरुणाईचा” या युवक महोत्सवात शनिवारी 4 ऑक्टोबरला गायन, एकल नृत्य, सामूहिक नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इंद्रायणी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, बी. फार्मसी, डी. फार्मसी महाविद्यालय, यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मुलांचा उत्साह पाहता सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक असे सादरीकरण केले. या प्रसंगी उपस्थित इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के.मलघे, यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य डॉ. साहेबराव पाटील, उपप्राचार्य प्रा.एस. पी.भोसले, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य मलघे सर यांनी मुलांचा उत्साह बघता व सादरीकरणाचा दर्जा बघता, आपण एकत्रित स्नेहसंमेलन करूयात असे आश्वासन दिले. गायन व नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.कादंबरी घाटपांडे,प्रा.राधिका साठे, प्रा.विलासिनी पांडव यांनी काम पाहिले. समारोप प्रसंगी डॉ. साहेबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्तही इतर कलांसाठी संस्था आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही दिली. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे, कार्यवाह श्री.चंद्रकांत शेटे यांच्या संकल्पनेतील युवा महोत्सव उत्साही वातावरणात पार पडला. महोत्सवाचे संयोजन नाट्य विभाग प्रमुख प्रा. आर. आर. डोके, प्रा. क्षिप्रसाधन भरड व प्रा. कृष्णा मिटकर यांनी केले. तर आभार प्रा.हर्षदा पाटील मॅडम यांनी मानले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page