केंद्र सरकारने व्यापारी/घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठ्या साखळीतील किरकोळ विक्रेते, प्रक्रियाकर्त्यांना तांदूळ/धानाचा साठा उघड करणे केले अनिवार्य “भारत तांदूळ” या ब्रँड अंतर्गत ग्राहकांना तांदळाची किरकोळ विक्री सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

SHARE NOW

एकूणच अन्नधान्य महागाईचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि तथ्यहीन अनुमान रोखण्यासाठी, केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील व्यापारी/घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठ्या साखळीतील किरकोळ विक्रेते, प्रक्रियाकर्त्यांना पुढील आदेशापर्यंत तांदूळ/धानाचा साठा उघड करणे अनिवार्य केले आहे. संबंधित कायदेशीर घटक जसे की व्यापारी/घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठ्या साखळीतील किरकोळ विक्रेते, प्रक्रियाकर्त्यांना (i) तुकडा तांदूळ, (ii) बिगर -बासमती पांढरा तांदूळ, (iii) उकडा तांदूळ, (iv) बासमती तांदूळ, (v) धान यांसारख्या श्रेणींमध्ये धान आणि तांदळाच्या साठ्याबाबतची माहिती जाहीर करावी लागेल. या घटकांनी दर शुक्रवारी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या पोर्टलवर (https://evegoils.nic.in/rice/login.html) अद्ययावत माहिती देणे अपेक्षित आहे. ऑर्डर जारी केल्यापासून 7 दिवसांच्या आत तांदळाच्या साठ्याची स्थिती या घटकांना घोषित करावी लागेल.

Advertisement

याशिवाय, खाद्य अर्थव्यवस्थेतील महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी, सर्वसामान्य ग्राहकांना ‘भारत तांदूळ’ ची किरकोळ विक्री सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात, नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भांडार या 3 संस्थांमार्फत ‘भारत तांदूळ’ ब्रँड अंतर्गत किरकोळ विक्रीसाठी 5 एलएमटी तांदूळ वाटप करण्यात आले आहेत. सामान्य ग्राहकांना भारत तांदूळ विक्रीसाठी किरकोळ किंमत रु. 29/किलो आहे. तांदूळ 5 किलो आणि 10 किलोच्या पिशवीतून विकला जाईल. भारत तांदूळ फिरत्या व्हॅन आणि तीन केंद्रीय सहकारी संस्थांच्या दुकानात खरेदीसाठी उपलब्ध असेल आणि लवकरच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह इतर किरकोळ साखळीद्वारे देखील उपलब्ध होईल.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page