ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट ‘ट्रिनिटी प्रीमियर लीग (टीपीएल 2026)’ स्पर्धेचे आयोजन

SHARE NOW

कोंढवा

ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ. अभिजीत औटी सर यांच्या पुढाकाराने महाविद्यालयातर्फे राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे दि. 18 ते 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. आज दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात महाविद्यालयामार्फत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सध्याच्या धावपळीच्या युगात शारीरिक हालचालींना व विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. राजलक्ष्मी शिवंकर मॅडम (डीसीपी, पुणे शहर, पुणे) व मा. आयुष गांधी सर (एपीएल पंजाब टीम खेळाडू, युवा क्रिकेटर, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन करताना मा. राजलक्ष्मी शिवंकर मॅडम यांनी सर्वांना संबोधित करताना सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या 21 व्या शतकात शैक्षणिक विकासाबरोबर आपल्या क्रीडा क्षेत्रातही आधुनिकतेच्या दृष्टिकोनातून विकास साधून मोठ्या प्रमाणावर प्रगती साध्य करता येते. अशा विविध स्पर्धात्मक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. आपला विकास आधुनिक साधनसामग्रीचा वापर करून आपले कौशल्य कसे प्रभावी करता येईल, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. पोलीस क्षेत्रात काम करताना येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाताना अफाट परिश्रम व मेहनतीच्या जोरावर अनेक पुरस्कार प्राप्त केल्याचा अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांशी शेअर केला आणि आपण देखील अशी प्रगती साध्य करू शकता, फक्त मनामध्ये जिद्द व सातत्य असणे आवश्यक आहे, असे सांगितले. निरोगी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करत संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला. तसेच प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत आणि समाजातील कायदे व नियमांचे पालन करावे, असे मार्गदर्शन केले. प्रत्येक शिक्षकाने आपल्या अध्यापन कार्यासोबत शारीरिक विकासही उत्तम ठेवावा व आपल्या प्रत्येक कार्याचे योग्य मूल्यमापन करावे, असेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी महाविद्यालयातील या स्पर्धेचे उद्दिष्ट व भविष्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी होणारा उपयोग याविषयी सविस्तर माहिती प्राचार्य डॉ. अभिजीत औटी सर यांनी दिली. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

तसेच कार्यक्रमाला मा. आयुष गांधी सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शारीरिकदृष्ट्या माणूस तंदुरुस्त असल्याशिवाय कोणतेही काम व्यवस्थित करता येत नाही. आपल्या अंगी असलेल्या हुशारीला चालना देण्यासाठी देखील शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची असते. त्यांनी आपल्या क्षेत्रात आरोग्य आणि फिटनेस किती महत्त्वाचे आहेत, याची माहिती देताना क्रिकेट क्षेत्रातील आपल्या जीवनप्रवासात केलेले परिश्रम, खेळातील कारकिर्दीतील सातत्य आणि त्याच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर निर्माण केलेले अस्तित्व याबाबत सखोल माहिती दिली व सर्वांना प्रेरणा दिली.

Advertisement

के. जे. शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. कल्याण जाधव सर यांनी सांगितले की, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी व विकासासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यातूनच उत्तम खेळाडू निर्माण होतात. क्रिकेटमध्ये सर्वांनी एकत्र येऊन सांघिक खेळ करत यश संपादन करावे. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी असे उपक्रम आम्ही सतत राबवत असतो. यासाठी प्राध्यापकांनी शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान व उपकरणांचा वापर करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावा आणि क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. आपल्या केजेआय शैक्षणिक संकुलात 110 हेक्टर विस्तृत क्षेत्रामध्ये सर्व खेळांसाठी (इनडोअर व आउटडोअर) अद्ययावत मैदाने उपलब्ध आहेत. उदा. क्रिकेट, फुटबॉल, 50 मीटर स्विमिंग पूल, बास्केटबॉल, टेनिस इत्यादी. विद्यार्थ्यांनी या सुविधांचा उपयोग करून विविध खेळांमध्ये नावलौकिक मिळवावा. अशा प्रकारच्या नवनवीन स्पर्धांचे आयोजन करावे, तसेच 21 व्या शतकाला अनुसरून खेळातील अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर वाटचाल करण्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करत सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे कार्यकारी संचालक मेजर जनरल (निवृत्त) समीर कल्ला सर, तांत्रिक संचालक डॉ.अजय फुलांबरकर व संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनीही या प्रसंगी सर्वांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांतून एकूण 64 संघ सहभागी झाले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले आहेत. उदा. सिंहगड कॉलेज, झील कॉलेज, डी. वाय. पाटील कॉलेज, जेएसपीएम कॉलेज, एस. पी. कॉलेज, परिक्रमा कॉलेज, दौंड इत्यादी. ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. अभिजीत औटी सर यांनी सांगितले की, अशा प्रकारचे नवनवीन क्रीडा स्पर्धांचे उपक्रम महाविद्यालयात अग्रस्थानावर राबविण्यात येतात आणि पुढेही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच या कार्यक्रमासाठी के. जे. शिक्षण संकुलातील सर्व प्राचार्य उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. अभिजीत औटी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सूत्रसंचालन प्रा. नीलिमा औताडे यांनी केले. डॉ. विलास गायकवाड (विभागप्रमुख), डॉ. प्रमोद मागाडे (विभागप्रमुख), प्रा. महेंद्र हंडोरे (विभागप्रमुख), डॉ. वैभव शेलार (विभागप्रमुख), डॉ. शुभांगी हंडोरे (विभागप्रमुख), डॉ. गीतिका नारंग (विभागप्रमुख), डॉ. जयश्री सत्रे (विभागप्रमुख), प्रा. अमोल साळवे (क्रीडा विभागप्रमुख), प्रा. अमोल भोसले, प्रा. प्रसाद भोसले, प्रा. शरद भोसले, प्रा. मनोज खराडे, श्री. संतोष लिम्हण तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page