तळेगाव नगरपरिषदेचा जेसीबी जळल्याप्रकरणी गुन्हाची नोंद.
तळेगाव दाभाडे:तळेगाव दाभाडे नगर परिषदेने एका ठेकेदाराला भाडेतत्त्वावर दिलेला जेसीबी जळून खाक झाला.
ही घटना सोमवारी दिनांक 8 जानेवारी रात्री आठ ते मंगळवारी 9 जानेवारी साडेसात वाजताच्या सुमारास मूरखळा घनकचरा संकलन केंद्र तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक संदीप कोळेकर यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कोळेकर हे अशोक इंटरप्राईजेस या कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करतात. तळेगाव दाभाडे नगर परिषदेने त्यांच्या कंपनीला भाडेतत्त्वावर जेसीबी ( एम एच 14 / जे यु 5271) चालवण्यासाठी दिला आहे. त्यांनी जेसीबी तळेगाव दाभाडे घनकचरा संकलन केंद्रात पार्क केला होता. अज्ञाताने जेसीबी ला आग लावली. यामध्ये जेसीबी जळून खाक झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.






