विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल** *नाम गजरात दिंडी सोहळा संपन्न*
श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये 09/12/ 2023 रोजी दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी चे अध्यक्ष रो.राहुल खळदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.स्वाती खळदे,सर्व मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, साहित्य पूजन, पालखी पूजनाने करण्यात आली.
कार्तिकी उत्पत्ती एकादशी व ज्ञानेश्वरीचे रचनाकार, सर्वसामान्यांना भक्तीतून मुक्तीचा मार्ग दाखविणारे ‘ज्ञानसूर्य’ ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर’ यांचा संजीवन समाधी सोहळा याचे औचित्य साधून दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कार्तिकी एकादशी आणि दिंडीचे महत्त्व विद्यार्थ्यांना शालेय शिक्षिका सौ.शुभांगी कदम यांनी सांगितले.
विद्यालयातील विद्यार्थिनींनी सुरेल आवाजामध्ये गवळण आणि अभंग सादर करुन वातावरण भक्तीमय केले.
बाल वारकऱ्यांनी रिंगण करून फुगड्यांचे विविध खेळ सादर केले.

सदर कार्यक्रमास रोटरी क्लब तळेगाव एम आय डी सी चे अध्यक्ष रो.राहुल खळदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.स्वाती खळदे, सचिव रो.सुनील खोल्लम, श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मा.दादासाहेब उ-र्हे , सचिव श्री.शेलार सर,सहसचिव तसेच स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल शालेय समिती अध्यक्षा सौ. रजनीगंधा खांडगे , खजिनदार श्री.सुदाम दाभाडे,शालेय मुख्याध्यापिका सौ.शमशाद शेख, पर्यवेक्षिका सौ.रेणू शर्मा, माध्यमिक विभाग प्रमुख सौ.सुजाता गुंजाळ, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ.तेजस्विनी सरोदे, प्राथमिक विभाग प्रमुख सौ.धनश्री पाटील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी ,बाल वारकरी उपस्थित होते.
‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’ जयघोष करत, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती भगवी पताका , टाळ-मृदुंगाच्या च्या गजरात दिंडीचे विठ्ठल मंदिराच्या दिशेने प्रस्थान झाले.
‘महाराष्ट्र संतांची भूमी’ हा फिरता देखावा सादर करण्यात आला. तसेच ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुंदर अशा वेशभूषा करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आणि मनमुराद आनंद लुटला.
या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका सौ.शमशाद शेख,पर्यवेक्षिका सौ.रेणू शर्मा,सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका सौ.प्रज्ञा अहिरे यांनी केले.
या स्तुत्य उपक्रमाचे श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.संतोष खांडगे , कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंदे यांनी कौतुक केले आणि कार्तिकी एकादशीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून दिंडी सोहळ्याचा समारोप करण्यात आला.






