स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा.
श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिशस्कूलमध्ये १४ नोव्हेंबर रोजी* *पंडित जवाहरलाल नेहरु यांचा* जन्मदिवस ‘बालदिन आनंद, उत्साह आणि स्नेहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ रेणू शर्मा मॅडम, पर्यवेक्षक श्री सिद्धेश्वर सोनवणे आणि सर्व वर्गांचे वर्गप्रतिनिधी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली .
यानंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.रेणू शर्मा मॕडम यांचा स्वागतपर सत्कार विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री सिध्देश्वर सोनवणे यांनी केला. या शुभ प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते इ.10 वीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षणाचा भाग ठरला. संगीत शिक्षिका सौ अपेक्षा पाटील यांनी यावेळी सादर केलेल्या सुरेल गीताने वातावरण आनंदमय केले. तसेच विद्यालयाचे शिक्षक श्री सचिन झेंडे यांनी “बाप माहीत असतो, पण तो कधीच समजत नाही” या कवितेमधून विद्यार्थ्यांना कुटुंबातील नातेसंबंधांची जाणीव करून दिली .
यानंतर इ. 5 वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले “इ.10 तुकडी-ड” हे नाटक विशेष कौतुकास्पद ठरले. नाटकातून* *प्रत्येक मुलामध्ये वेगळेपणा असून त्या वेगळेपणामुळेच प्रत्येक व्यक्ती विशेष असते हा सुंदर संदेश* *प्रभावीपणे* *पोहोचविण्यात आला. यानंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.रेणू शर्मा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या हार्दिक* *शुभेच्छा देत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जन्मतिथी म्हणून हा दिवस देशभर बालदिन म्हणून साजरा केला जातो. मुलांवर अपार प्रेम असल्यामुळे त्यांना “चाचा नेहरू” म्हणून विशेष ओळख मिळाली. “आजची मुले म्हणजे उद्याचे शिल्पकार” हा त्यांचा संदेश विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरला, असे प्रोत्साहनपर मनोगत मांडल . याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षिका कु.प्राची साळवे यांनी केले तर पर्यवेक्षक सिद्धेश्वर सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची यशस्वी सांगता केली.
अशा प्रकारे बालदिनाचा हा उत्सव विद्यार्थ्यांना आनंद, प्रेरणा आणि सकारात्मकतेचा सुंदर अनुभव देऊन यशस्वीरीत्या पार पडला.
श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष खांडगे सर,संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब उऱ्हे सर ,शालेय समिती अध्यक्षा सौ रजनीगंधा खांडगे मॅडम,कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे सर, सचिव श्री मिलिंद शेलार सर यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






