नवा दिवस, नवा श्वास… नवा उत्सव! स्माईल व्यसनमुक्ती केंद्रात ‘गणेशोत्सव 2025’ ला दमदार सुरुवात
तळेगाव दाभाडे :
व्यसनमुक्तीच्या वाटेवर नवा श्वास घेत जीवन पुन्हा रंग उधळू लागते आणि प्रत्येक क्षण साजरा करण्याची प्रेरणा मिळते. अशाच उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात स्माईल व्यसनमुक्ती केंद्रात गणेशोत्सव 2025 ला जोशपूर्ण सुरुवात झाली.
स्माईलचे श्री. रोहन यादव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कोणार्क सूर्य मंदिर थीममध्ये बाप्पाचे आगमन झाले. श्री. प्रकाश धिडे यांच्या नियोजनात पारंपरिक मिरवणुकीत फटाके, ढोल-ताशे, आणि रुग्णमित्रांचा उत्साही सहभाग दिसून आला. श्री. अजिंक्य देशपांडे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा आणि श्री. हर्षल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा-अर्चा संपन्न झाली.
यानंतर बासुंदी, पोळी, दहिभात, कोशिंबीर असा सुग्रास जेवणाचा बेत सर्वांना दिला गेला. दुपारी २.३० वाजता स्माईलचे प्रकल्प समन्वयक श्री. राहुल बोरुडे यांच्या नियोजनात गणेश देखाव्याचे अनावरण माजी नगरसेवक मा. श्री. संतोषजी दाभाडे यांच्या हस्ते झाले. या वेळी रुग्णमित्रांनी नृत्यातून भावपूर्ण गणेशवंदना सादर केली.
कार्यक्रमाच्या विशेष भागात स्माईलने तयार केलेला जनजागृतीपर व्हिडीओ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदर्शित झाला. यावेळी संस्थापक मा. श्री. हर्षलजी पंडित, श्री. दिपकजी फल्ले, श्री. निखिलजी महापात्रा उपस्थित होते. श्री. पंडित यांनी या व्हिडीओचा उद्देश स्पष्ट केला तर श्री. संतोषजी दाभाडे यांनी स्माईलच्या कार्याचे कौतुक करून संस्थेच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्माईलचे श्री. प्रणव देशमुख, श्री. नितीन नाटेकर, श्री. अनिल सावंत, श्री. राहुल केळकर, श्री. आनंद भागवत, श्री. जयंत खेर्डेकर, श्री. अमेय कुलकर्णी, श्री. राजेंद्र ढूस व कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.






