इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना स्वतः मोठं होऊन आपल्या गावाचे समाजाचे, देशाचे नाव मोठे करावे – अध्यक्ष रामदास काकडे
शिवणे :

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या श्री.संत तुकाराम माध्यमिक विद्यालय शिवणे मावळ येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तसेच मॅकवर्ड्स कंपनीच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या नवीन वर्ग खोल्यांचे उद्धाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी रोटरी क्लबचे तसेच मॅकवर्ड्स कंपनीच्या
सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना आपलं स्वतःचे नाव मोठे करताना आपल्या गावाचे समाजाचे तसेच देशाचे नाव मोठे करावे ही अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चे माजी अध्यक्ष कमलेश कारले,श्रीशैल मेहंते दीपक शहा, विलास जाधव, भालचंद्र लेले,मथुरे,विकास उभे मॅकवर्ड्स कंपनीचे विशाल नार्वेकर, स्टीफन सांच,विनिता लास्कर, हेमंत काळे, अनिकेत भोसले, इंद्रायणी विद्या संस्थेचे संजय साने,युवराज काकडे शालेय समिती अध्यक्ष संदिप काकडे माजी जिल्हा परिषद सदस्य भरत शिंदे माजी सभापती एकनाथ टिळे बांधकाम व्यावसायिक किशोर लामकाने माजी सरपंच विलास टिळे आदि शिवणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र शेळके सुत्रसंचलन रामदास टिळे तर आभारप्रदर्शन शालेय समिती अध्यक्ष संदिप काकडे यांनी केली.यावेळी विद्यालयातील शिक्षकवृंद मनोहर खुने ठक्का दातीर,अशोक धनोकार, अभिजित गराडे,नितिन जाधव, संभाजी भोते तसेच शिक्षकेतर कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.






