शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ,उपचारासाठी पुण्यात दाखल..!

SHARE NOW

पुणे -शरद पवार यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागल्याने सोमवारी दुपारी त्यांच्या ताफा कार्डियाक अॅम्ब्युलन्ससह पुण्याच्या दिशेने रवाना झाला. तेथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येतील, अशी प्राथमिक माहिती कळते आहे.

 

शरद पवार यांना खोकला आणि कफ आहे. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. शरद पवार मास्क लावून वेगळ्या गाडीने पुण्याकडे रवाना झाले आहेत. शरद पवारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक सकाळपासूनच गोविंदबागेत दाखल झाले होते. सुमारे तासभर तपासणी केल्यानंतर त्यांना पुण्याला उपचारासाठी जाण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या.

Advertisement

शरद पवार यांना प्रचंड थकवा

 

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी राज्यभरातून नेते पदाधिकारी बारामतीला येत आहेत. सहयोगला जाऊन दादांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन संबंधित सगळेच जण गोविंदबागेक शरद पवार यांची भेट घेण्याकरिता जात आहेत. जवळपास आठ दिवस हा दिनक्रम सुरू असल्याने शरद पवार यांना प्रचंड थकवा आल्याचे सांगण्यात येते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page