सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

SHARE NOW

तळेगाव दाभाडे

सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. साहेबराव दामोदर बागले (राज्य वस्तू व सेवा कर विभागातील सहाय्यक आयुक्त, येरवडा, पुणे) हे उपस्थित होते.

या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष सुनील भेगडे, उपाध्यक्ष विजय गरुड, सचिव दत्तात्रय नाटक, अध्यक्ष अरुण भेगडे, राहुल गोळे, खंडुजी टकले आणि चेअरमन रामराव जगदाळे हे उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर झाले. दिशा जामदार हिने संविधानाची प्रस्तावना व प्रतिज्ञा घेतली, तर स्मितल रहाळकर या सहशिक्षिकेने असाक्षरमुक्त गावाची शपथ घेतली. यानंतर विद्यार्थ्यांनी आकर्षक घोषणा, देशभक्तिपर गीत, नृत्य, योगा प्रशिक्षण, पिरॅमिड तसेच कराटेचे प्रात्यक्षिक सादर केले. तर शिशु गटातील व प्राथमिक गटातील विद्यार्थींनी कवायत सादर केली.

Advertisement

आपल्या मनोगतात प्रमुख पाहुण्यांनी आजच्या तरुण पिढीची ऊर्जा, देशाच्या विकासातील त्यांची भूमिका व प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.यानंतर अध्यक्ष सुनील भेगडे यांनी शाळेच्या प्रगतीबाबत व समाजातील मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या गरजेवर मार्गदर्शन केले.कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षिका पद्मा नायडू व विद्यार्थीनी अनिशा गायकवाड हिने केले. तर आभार प्रदर्शन अंजली मोरे यांनी केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मुख्याध्यापिका रंजीता थंपी व उपमुख्याध्यापिका सावनी दिवाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page