न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

SHARE NOW

वडगांव मावळ –

Advertisement

शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य मावळ तालुक्यातील वडगांव शहरातील रयत शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्या मंदिर व न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल, वडगाव मावळ शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संयुक्तरित्या मोठया उत्साहात संपन्न झाले. विद्याथ्यामधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आधुनिक युगात शालेय शिक्षणाबरोबर नृत्य, कला, संगीत, नाट्य, गायन आणि अभिनय या गोष्टीचा सहभाग असायला हवा जेणेकरून सर्व क्षेत्रात विद्याथ्यांना त्यांचे करिअर घडविण्याची संधी प्राप्त होईल या अनुषंगाने शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडगांव मावळ नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष श्री. सुनीलभाऊ ढोरे हे होते. सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजिका सौ. वर्षाताई शाह व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. खाडे एन. एम. व सौ. सुनीता बारवकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात वर्षभरात शाळेत घेतले जाणारे संपूर्ण सहशालेय उपक्रम व विविध क्रीडा स्पर्धा व मनोरंजनात्मक स्पर्धा या विषयी माहिती दिली. सामाजिक कार्यकर्त्यां सौ. वर्षा शाह यावेळी बोलतांना म्हणाल्या की, डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत असतांना या शाळेतील मुलांनाही संगणकीय ज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले व प्राथमिक विभागाला देखील 10 संगणक भेट देत असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुनिलभाऊ ढोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना शाळेची होत असलेली प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले व विद्याथ्यांच्या भौतिक विकास व्हावा यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी मुख्याध्यापिका सौ. जयश्री लेंभे, अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या सौ. अनिता धायगुडे यांनीही शाळेस व विद्याथ्यांना आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते वर्षभरातील विविध स्पर्धा तसेच एम. टी. एस., आय. टी. एस. परीक्षेत विशेष प्रविण्यासह उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्याथ्यांचा सत्कार प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष श्री. भगवान कादे व स्वप्नील उभे यांच्यावतीने शाळेतील गुणवंत शिक्षकांचाही सन्मानचिन्ह देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुनील ढोरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. किरण नवले यांनी शाळेला ज्या भौतिक सुविधाचा अभाव आहे त्यापूर्ण करण्यासाठी प्रमुख पाहुण्यांकडून शाळेस भरीव मदत करण्याचे आवाहन आपल्या भाषणातून केले केले. याप्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष श्री. भगवान कादे, स्वप्नील उभे, न्यू इंग्लिश स्कूल ज्यु. कॉलेजचे प्राचार्य सतीश हाके, उदय टकले, उद्योजक श्री. सचिन ढोरे, विजय टकले, खांडेकर, मनोज सुपेकर, नगरसेवक श्री. गणेश म्हाळसकर, भिमाजी भागवत सर्व माता-पिता पालक, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक एन. एम. खाडे, सौ. सुनीता बारवकर, किरण नवले, निलेश गवई, कीर्ती वहिले, सुमन दळवी, कलावती काळढोके, स्वाती खुडे, रेश्मा गायकवाड, रीमा शिंदे, वैष्णवी नांगरे, सोनू गजभिव, काव्या जाधव, मोनिका धोत्रे, रुपाली ढोरे, रोहिणी सुपेकर आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन श्री. किरण नवले, सौ. कीर्ती वहिले, मोनिका धोत्रे यांनी केले. शेवटी सर्वांचे आभार किरण नवले यांनी मानले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page