मावळ तालुका शिवसेनेच्यावतीने जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमसभा घेण्यात यावी यासाठी निवेदन दिले.
मावळ :
शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी मावळ तालुक्या मधील 103 ग्रामपंचायती मधील व शहर विभागाच्या समस्या बाबत आमसभा घेण्यात यावी यासाठी तहसीलदार यांना मावळ तालुका शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले यावेळी नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी निवेदन स्वीकारले.
देशाच्या स्वातंत्र्यच्या 15 ऑगस्ट च्या तारखे नुसार किंवा सन्मानित मावळ मधील खासदार आमदार व इतर जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती च्या लोकप्रतिनिधी च्या माध्यमातून आम सभा घेण्यात येत आहे आमसभा म्हणजे सर्व सामान्य जनेतेच्या प्रलंबीत प्रश्नांना वाचा फोडन्याचं एक साधन म्हणजे आमसभा सर्व शासकीय खाते प्रमुख निहाय जनते समोर ज्वलंत प्रश्न सोडवण्याचं माध्यम व गोर गरीब शेतकरी दिन दलित यांचे प्रामुख्याने प्रश्न सोडवण्याच साधन म्हणजे तालुका आमसभा
म्हणून मावळ शिवसेनेची आग्रहाची भूमिका आहे कि प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामसभा घेऊन त्यांची अंमल बाजवणी करणे व सर्व खाते निहाय शासकीय खाते प्रमुख अधिकारी आपल्या कामात योग्य आहे का खरच ते कामे करतात का? किंवा ग्रामपंचायत नियमानुसार कामे होतात का?
या बाबत आपण स्थानिक खासदार श्री श्रीरंग आप्पा बारणे व आमदार श्री सुनील आण्णा शेळके व जिल्हा परिषद पुणे चे प्रमुख गट विकास अधिकारी मावळ व मावळ मधील सर्व खाते प्रमुख या अधिकारी मार्फत
आमसभा लवकर घेणे असे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, युवासेना अध्यक्ष राजेश वाघोले युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुळावले,संघटक मदन शेडगे, चंद्रकांत भोते उपतालुका प्रमुख, राम सावंत उपतालुका सोमनाथ कोंडे विभाग प्रमुख सहादू बडेकर नवनाथ सेठ हारपुढे इत्यादी उपस्थित होते.






