कात्रज तलावावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे रंगकाम पूर्ण.. नगरसेविका पूजाताई तुषार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रंगकाम संपन्न..

SHARE NOW

कात्रज

 

मागील महिन्यात पुणे महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीच्या धामधुमाळीतून पुणेकर सावरले अन प्रभाग क्रमांक 40 च्या नगरसेवकांनी आपल्या कामाला सुरुवात केली. प्रभाग क्रमांक ४० च्या नवनिर्वाचित नगरसेविका पुजाताई तुषार कदम यांनी आपल्या कामाची सुरुवात कात्रज तलावावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे रंगकाम करून सुरुवात केली.

 

 

कात्रजची भूमी हि शिवस्पर्शान पावन झालेली आहे. त्या भूमीत छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा रुजलेला आहे. छत्रपतींच्या नावाने कात्रजकर या कात्रज तलावावर नतमस्थक होत असतात. कात्रज तलावावरची छत्रपती शिवरायांची आणि छत्रपती शंभुराजे यांची मूर्ती दोन्हीही एकाच ठिकाणी असल्याने शिवप्रेमींची प्रचंड गर्दी होत असते. आलेल्या सर्व शिवभक्तांचे शिवशंभु प्रतिष्ठान व महेश कदम मित्रपरिवार यांच्या वतीने स्वागत केले जाते.

Advertisement

 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे रंगकाम व सुशोभीकरण करून आपण आपल्या कामाची सुरुवात केल्याचे समाधान यावेळी नगरसेविका पुजाताई तुषार कदम यांनी सांगितले.

 

छत्रपती शिवरायांच्या विचारांचे आचरण करून प्रत्येकाने आपल्या जीवनात स्वावलंबी बनावे आणि हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करावे असे आवाहन यावेळी नगरसेविका पूजा कदम यांनी केले आहे.

 

फोटो ओळ :- छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे रंगकाम पूर्ण.

 

चौकट

सौ. पुजाताई तुषार कदम

नगरसेवक, पुणे मनपा.यांनी आपल्या कामाची सुरवात शिवजयंतीच्या मुहूर्तावर

छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे सुशोभीकरण करून केली. याचा आम्हा

कात्रजकर व शिवभक्तांना सार्थ अभिमान आहे.असे मत

शिवशंभु प्रतिष्ठाण

संस्थापक _अध्यक्ष

श्री महेश सुरेशराव कदम यांनी व्यक्त केले.

यावेळी शिवप्रेमी

राजुआप्पा लाटमे,

अंकुश उमरठकर,

मनोज व्हनमाने, आदी शिवप्रेमी उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page