जागा खरेदी-विक्री प्रकरणात लाखोंची फसवणूक; आरोपी सचिन रमेश खिवंसरा याच्यावर गंभीर आरोप
पुणे – जागा खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून भूषण सुधाकर खैरनार आणि उद्योजक अंकित वणवे पाटील यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली.
दोघांनीही आरोपी सचिन रमेश खिवंसरा याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे अनेक व्यवहार दाखवत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या व्यवहारांमधून भूषण खैरनार यांची तब्बल ३३ लाख रुपये, तर अंकित वनवे पाटील यांची २२ लाख रुपये अशी मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे सांगण्यात आले.
१) पहिला व्यवहार – धावडे, खेड तालुका, रत्नागिरी जिल्हा
खरेदीसाठी दाखवलेली जमीन व कागदपत्रे प्रत्यक्षात वेगवेगळ्या जागांची असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या व्यवहारातून आरोपीने खैरनार यांच्याकडून १६ लाख रुपये घेतले.
२) दुसरा व्यवहार – आंबे शिवथर, महाड तालुका, रायगड (2022)
या जागेसाठी केलेली कागदपत्रे खैरनार यांच्या नावावर करायची होती तरी त्या जागेचे मूळ मालक बाबुराव श्रीपत दिघे हे २०११ मध्येच मयत असल्याचे मृत्यू प्रमाणपत्राद्वारे उघड झाले. तरीही आरोपीने या व्यवहारातून साडे १४ लाख रुपये घेतले. मृत व्यक्तींच्या नावाने कागदपत्रे तयार केल्याचे पुरावे पत्रकार परिषदेत दाखवण्यात आले.
३) तिसरा व्यवहार – तळीये गाव, महाड तालुका
या व्यवहारात आरोपीने खैरनार यांना मालक नरेश शिंदे यांना ३ लाख रुपये ॲडव्हान्स द्यावा लागेल असे सांगून पुन्हा दिशाभूल केली. तसेच रत्नागिरी व रायगड येथील आधीच्या दोन व्यवहारांतील रक्कम या तिसऱ्या जागेत समायोजित करू असे अमिषही दाखवले.
अंकित वणवे पाटील यांची २२ लाखांची फसवणूक
या व्यवहारांव्यतिरिक्त, उद्योजक अंकित वणवे पाटील यांच्याकडूनही आरोपीने वेगवेगळ्या सबबी सांगत २२ लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला.
खैरनार यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे येथे अधिकृत अर्ज दाखल केला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
*पुणेकरांना आव्हान*
उद्योजक:
•अंकित वणवे पाटील
यांनी पुणेकरांना आशा खोट्या व बनावट व्यवहारांना बळी पडू नये असे देखील पत्रकार परिषदेत आव्हान केले
•अंकित वनवे पाटील यांनी सर्व पुणेकरांना आव्हान केले आहे की, आरोपी सचिन रमेश खिवंसरा यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारची फसवणूक झालेली असल्यास अंकित पाटील हा स्वखर्चाने सर्वांच्या केसेस लढेल कृपया करून फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढाकार घेऊन तक्रार करण्यास सामोरे यावे ही विनंती.






