इंद्रायणी विद्या मंदिर- यशोदा महादेव काकडे अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा
तळेगाव दाभाडे:

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे व कार्यवाह चंद्रकांत शेटे आणि खजिनदार सौ निरुपा कानेटकर यांच्या मार्गदर्शनानुसार
मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयात उत्साहपूर्ण व सांस्कृतिक वातावरणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . हा दिवस थोर कवी व साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली . त्यानंतर सरस्वती मातेच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . अर्णव शिंदे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली . आकांक्षा भोसले हिने आपल्या प्रभावी भाषणातून मराठी भाषेचे महत्त्व विशद केले.
यानंतर श्रेया दाबणे हिने “निर्धार” ही प्रेरणादायी कविता सादर केली . पुढे यशोदा महादेव अभियांत्रिकी विद्यालयाचे विभाग प्रमुख श्री. महेश पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले . तन्वी गायकवाड व आदिती चौधरी यांनी “हीच आमची प्रार्थना” सादर करून वातावरण भक्तिमय केले . त्यानंतर तन्वी गायकवाड व श्रेया दमाने यांनी “आम्ही बोलतो मराठी” ही कविता सादर करून सर्वांची मने जिंकली .
कार्यक्रमाच्या शेवटी उपप्राचार्या मा. अमृता सुराणा मॅडम यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले त्या म्हणाल्या ग्रामीण भागातील लोकांपर्यंत तांत्रिक ज्ञान पोहोचवायचे असेल, तर मातृभाषेतूनच ते प्रभावीपणे शक्य होते. “लोकल टू ग्लोबल” हा मंत्र तेव्हाच यशस्वी होईल, जेव्हा आपण आपल्या स्थानिक भाषेला बळ देऊ.. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली व राजदीप गोरे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची यशस्वी समाप्ती केली .






