गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी मदतीचा हात!

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील अॕड्. पु.वा. परांजपे विद्या मंदिर प्रशालेतील ३१ गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी आर्थिक मदत करण्यात आली.

सुजाता कोळेकर (मॅनेजिंग डायरेक्टर, ॲसेंचर जपान) यांच्या पुढाकारातून व त्यांच्या विविध नामांकित कंपन्यांमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत सहकारी तेजस लिमये, विकास निलजकर, प्रसाद भागवत, राहुल तेनी, अजित महाले, संदीप भाले, प्रितीश परमार, निखिल बिर्ला, जितेंद्र दत्ता शर्मा, संदीप जाधव, लक्ष्मणराज संकारलिंगम, अभिलाष के, अतुल लिमये, अनुप लिमये, सागर नेवे, हिमांशु गुप्ता व रवी पंजाबी यांच्या माध्यमातून ही मदत उपलब्ध झाली.

Advertisement

शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, पर्यवेक्षिका रेखा भेगडे, शिक्षकवृंद व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत धनादेश प्रदान करण्यात आला. या उपक्रमामागे अध्यापिका सुवर्णा काळडोके यांचा विशेष प्रयत्न असून, मॅनेजर तेजस लिमये यांनी शाळेच्या भौतिक सुविधांच्या उभारणीत भविष्यात अधिक मदत करण्याचे आश्वासन दिले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page