धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

Advertisement

धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे यावर्षी रौप्य महोत्सव वर्ष असून पतसंस्थेने दिनांक १३/०२/२४ रोजी पतसंस्थेत सत्यनारायण महापूजा व सभासद मेळावा आयोजित केला होता. यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सभासदास भेटवस्तू देण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी गणेश भेगडे, रवींद्र दाभाडे, संतोष वि.भेगडे, सत्यंद्रराजे दाभाडे विलास काळोखे,सुरेश शेंडे,बिजेंद्र किल्लावाला,रेश्मा फडतरे पद्माताई ढोरे तसेच इतर पतसंस्थाचे अध्यक्ष व संचालक,बँक अधिकारी,पत्रकार,हितचिंतक इ. मान्यवर यांनी उपस्थिती लावली. तसेच दिनांक 14/ 2 /2024 रोजी पतसंस्थेचे सचिव श्री संजय शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मावळातील सर्वांसाठी भव्य लकी ड्रॉ व खेळ पैठणीचा ठेवण्यात आला होता. सदर खेळास हजर राहून 1200 हुन अधिक महिला व पुरुष यांनी सहभाग घेतला. यावेळेस मान्यवर म्हणून सारिकाताई शेळके, सायलीताई बोत्रे, अमृता टकले( पंडित)सत्यशील राजे दाभाडे ,उषाताई संजोग वाघेरे, अरुण माने, आशिष ठोंबरे, वनिता ताई मु-हे, शैलजाताई खंडागळे, निशा पवार,सतिश गरुड, मा.पत्रकार व.इ.मान्यवर उपस्थित होते तसेच दरवरषी पतसंस्थेतर्फे देण्यात येणारा कर्तव्यनिष्ठ पुरस्कार श्री निलेश गराडे ( वन्य जीव रक्षक) यांना देण्यात आला पतसंस्थेत 25 वर्ष बचत करत असलेल्या शैलेश वहिले व प्रविण जगदाळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला व इंग्लंडमध्ये डॉक्टर पदवी घेणाऱ्या कु.आर्या जितेंद्र बोत्रे हिचा ही सत्कार करण्यात आला. तसेच होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे खूप सुंदर पद्धतीने आयोजन करून सर्व महिला व पुरुष यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमास संस्थापक खंडूजी टकले अध्यक्ष विनोद टकले उपाध्यक्ष जितेंद्र बोत्रे सचिव संजय शिंदे खजिनदार सुधीर खांबेटे तसेच संचालक विजय शेटे, दत्तात्रय पिंजण,संतोष परदेशी, अमर खळदे,कैलास चव्हाण,केशव कुल,किरणताई किल्लावाला,कल्पनाताई चव्हाण,सुरेखाताई डेनकर ,निलेश पारगे,संकेत खळदे,दत्तात्रय साळुंके,मयूर वाघोले, संचालक दत्तात्रय शिंदे,मा.नगरसेवक सुनिल कारंडे,रोहित लांडे,स्वागत आदित्य टकले यांनी केले.प्रास्ताविक संजय शिंदे व उपस्थितांना मार्गदर्शन विनोद टकले यांनी केले. सुत्र संचालन शितल विजय शेटे यांनी केले. आभार मयुर पिंगळे यांनी मानले. होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये नीलम पापळ यांना पैठणी व वाशिंग मशीन भेटली, तसेच पूजा शिंदे शिलाई मशीन, सलोनी मोतीबने वाटर फिल्टर, संगीता ढेरे ब्लेंडर, सुनिता तराळकर इस्त्री, तसेच लकी ड्रॉ मध्ये रेणुका शिंदे फ्रिज, लीना कांबळे शिलाई मशीन, माधुरी शिरसाट गिझर, शोभा केदारी गॅस शेगडी, मनीषा साळुंखे फॅन, सुनिता तराळकर इस्त्री यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापिका सुनिता शेंडे, कर्मचारी वर्ग व दै.बचत प्रतिनिधी यांनी विशेष परिश्रम घेतले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page