देहूत भव्य महिला आरोग्य शिबीर; ५०० हून अधिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
देहू :
मावळचे जनसेवक आमदार मा. श्री. सुनिलआण्णा शेळके व कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सौ. सारिकाताई सुनिलआण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली देहूकर परिवार, देहू ट्रेकर्स आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, देहू शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला आरोग्य शिबिराला महिलांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला.
या शिबिराच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून मा. उपसरपंच श्री. प्रकाशभाऊ हगवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी देहूतील विविध सोसायट्यांमध्ये महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती मोहीम राबवली होती. त्याचाच सकारात्मक परिणाम म्हणून शिबिरात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला.
शिबिरामध्ये हीमोग्लोबिन तपासणी, थायरॉईड तपासणी तसेच कॅन्सर तपासणी मोफत करण्यात आली. तसेच नेत्रतपासणीसाठी नोंदणी करून पुढील महिन्यात तपासणी पूर्ण करून १ मे ‘कामगार दिना’च्या निमित्ताने गरजू महिलांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
रक्ताची कमतरता असलेल्या महिलांना योग्य आहार व उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच भविष्यात होणाऱ्या रक्तदान शिबिरासाठी महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याविषयीही माहिती देत श्री. प्रकाश हगवणे यांनी महिलांना रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
या उपक्रमासाठी देहूच्या प्रथम नगराध्यक्षा सौ. स्मिताताई शैलेश चव्हाण, उद्योजक श्री. विशालभैय्या परदेशी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर यादव यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच नगराध्यक्षा सौ. पुजाताई दिवटे, उपनगराध्यक्षा सौ. प्रियंकाताई मोरे, सौ. रसिकाताई काळोखे, सौ. शिल्पाताई परंडवाल, नगरसेविका,नगरसेवक योगेश पंरडवाल उद्योजक सागर गायकवाड,प्रा विकास कंद, सचिन साळुंखे नगरसेवक माणिक जाधव शैलेश चव्हाणव विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
निगडी येथील आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्रातील डॉक्टर आणि स्टाफ यांनी महिलांना आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच तळेगावातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून कॅन्सर तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले.
या आरोग्य शिबिराचा लाभ ५०० हून अधिक महिला भगिनींनी घेतला. शिबिराच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल महिलांनी संयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करत समाधान व्यक्त केले.






