तळेगाव दाभाडे नगरपरिषद या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यगीत असलेल्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचे सामुदायिक गायन करण्यात आले.. कु. प्रगती भास्कर वाघमारे हिने ‘अफझल खानाचा वध’ ह्या पोवाड्याचे गायन करून उपस्थितांची मने जिंकली.
Advertisementयावेळी भांडार विभाग प्रमुख सिद्धेश्वर महाजन तसेच शहर समन्वयक गीतांजली होनमाने यांनी महाराजांच्या अतुल्य कार्याचा गुणगौरव करून वर्तमानात युवकांना त्यांच्या असंख्य गुणांची कशा प्रकारे गरज आहे याची माहिती विशद केली… मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी आपण सर्व नागरिकांना योग्य प्रकारे तत्पर सेवा दिल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्याचे सार्थक होईल त्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपले कर्तव्य बजवावे असे आवाहन केले… यावेळी कर अधिकारी कल्याणी लाडे, कर निरीक्षक विजय शहाणे, भांडार प्रमुख सिद्धेश्वर महाजन, महिला व बालकल्याण विभाग प्रमुख सुवर्ण काळे, संगणक विभाग प्रमुख सोनाली सासवडे, शहर समन्वक गीतांजली होनमाने, आस्थापना लिपिक भास्कर वाघमारे, रोहित भोसले, करसंकलन लिपिक प्रवीण माने, विलास वाघमारे, आदेश गरुड, प्रवीण शिंदे, विशाल लोणारे, बाळासाहेब पवळे कर्मचारी सनी ननावरे, अभिजित हटवाल, महादेव गायकवाड, मंगेश मोईकर, राहुल आगळे, प्रकाश मकवाना, अंकुश जाधव, आकाश बीडलान, नाईक अनिल इंगळे, शिपाई चंद्रशेखर खंते, भिवा पिचड, शिक्षण मंडळ लिपिक बाळू जढर, मयुरेश मुळे आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता…