बेबडओहोळ येथे कॅनरा बँकेच्या CSR निधीतून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप
बेबडओहोळ :
बेबडओहोळ येथे कॅनरा बँकेच्या CSR (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतून ज्योतिबा विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करणे सुलभ होणार असून पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
या कार्यक्रमास सभापती सुनिता ताई मनोज येवले, उपसभापती साहेबराव कारके, जिल्हा परिषद सदस्या मनिषाताई मुंढे, माजी उपाध्यक्ष जिल्हा बँक अर्चनाताई घारे, सरपंच तेजलताई घारे, उपसरपंच ज्योतीताई घारे तसेच टाटा मोटर्सचे रमेश वाकडकर उपस्थित होते. ग्रामस्थांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.
याशिवाय कॅनरा बँकेच्या वतीने प्रगती विद्या मंदिर, इंदोरी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सांगवडे येथेही गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.






