अस्तोदय’ चरित्रग्रंथाचे तळेगाव दाभाडेत प्रकाशन
तळेगाव दाभाडे: संजय साखळे लिखित अस्तोदय हा चरित्रग्रंथ युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे.‘अस्तोदय’ हा केवळ चरित्रग्रंथ न राहता तळेगावच्या विकासाचा सजीव दस्तऐवजच आहे, असे
प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
स्थानिक इतिहास, संस्कार आणि कर्तृत्वाचे दर्शन घडवणाऱ्या ‘अस्तोदय’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
दादा-दादी पार्क येथील पुष्पावती बवले सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील होते. यावेळी फ्रेंड्स ऑफ नेचरचे संस्थापक महेश महाजन, कलापिनीचे मुख्य विश्वस्त डॉ.अनंत परांजपे,
फ्रेंड्स ऑफ नेचरचे अध्यक्ष
डॉ. गणेश सोरटे, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकृष्ण पुरंदरे,
माजी उपनगराध्यक्ष चंद्रभान खळदे, नगरसेवक निखिल भगत, नगरसेविका संगीता खळदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहास गरुड, मंगला साखळे, आश्लेष साखळे, अस्मिता साखळे, निर्मला गायकवाड, धनंजय मथुरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना लेखक साखळे यांनी तळेगाव दाभाडेच्या मातीतून घडलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या प्रेरणादायी कथा या ग्रंथातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.डॉ. श्रीपाल सबनीस, संतोष दाभाडे यांनी चरित्रग्रंथाचे कौतुक केले . शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक मीरा रामायणे यांनी केले. संपादक पल्लवी खंडागळे यांनी चरित्र ग्रंथाविषयी माहिती दिली.
सूत्रसंचालन विराज सवई यांनी केले.






