नाट्य परिषदेच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेचे आयोजन

SHARE NOW

तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी :

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे मावळ शाखेच्या वतीने कै. पै. मोहन महादेव काकडे यांच्या स्मरणार्थ थोर साहित्यिक कै. गो. नी. दांडेकर करंडक – २०२६ या दोन दिवसीय मावळ तालुका आंतरशालेय बालनाट्य (एकांकिका) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १७ व १८ फेब्रुवारी रोजी श्रीरंग कलानिकेतन, तळेगाव दाभाडे या ठिकाणी या स्पर्धा संपन्न होणार आहे. स्पर्धेचे हे ८ वे वर्ष आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे मावळ शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी सांगितले, की प्राथमिक गट (इयत्ता १ ली ते ४ थी) व माध्यमिक गट (इयत्ता ५ वी ते १० वी) अशा दोन गटात होणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक गटासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षीसासह रोख रक्कम, फिरता करंडक व सन्मानचिन्ह असे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, रंगमंच रचना, वैयक्तिक अभिनय यासाठीही पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

Advertisement

स्पर्धेचे बक्षीस वितरण १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीरंग कलानिकेतन येथे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रथम येणाऱ्या 20 संघांना या स्पर्धेत प्रवेश देणार असल्याने तालुक्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे आणि कार्याध्यक्ष व स्पर्धेचे प्रायोजक गणेश काकडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नयना डोळस (९९२१३८७३०७), राजीव कुमठेकर (८०८७४६३१९७), भगवान शिंदे (९८२२७२५४५१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page