वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्रमांक ५ तळेगाव दाभाडे नगर परिषद येथे मतदान जनजागृती अभियान संपन्न.

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्रमांक ५ येथे

Advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळेगाव नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात मतदान जनजागृती विषयक अभियान राबविण्यात आले. या अभियानात वक्तृत्व, निबंध, चित्रकला, वाद-विवाद स्पर्धा मतदार जनजागृती रॅली व शपथ असे विविध उपक्रम घेण्यात आले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री गिरीश दाबकेकर व नगरपरिषदेच्या शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी श्रीमती अनिता वैद्य मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विजया अविनाश दांगट यांनी दिली. शाळेतील सर्व विद्यार्थिनी व शिक्षक वर्ग यांनी उत्स्फूर्तपणे अभियानामध्ये सहभाग नोंदविला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page