वन्यजीव रक्षक संस्था, मावळचे संस्थापक निलेश गराडे यांना निनावी धमकीचा फोन

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :-तळेगाव, वन्य जीव रक्षक संस्था मावळ च्या सामाजिक कामाची सर्वत्र प्रशंसा कौतुक होत असताना त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्याऐवजी वन्य जीव रक्षक संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना दोन वेगवेगळ्या नंबर वरुन धमकीचे फोन पाण्यात बुडालेल्या मुलाला काढण्या साठी ऊशीरा गेलो व सोशल मिडिया वर बातमी का टाकली या कारणा वरुन धमकीचे फोन आले.

 

Advertisement

तसेच आपले मित्र आमदार सुनिल आंण्णा शेळके यांचे नाव घेऊन पण धमकी दिली की त्यांना सांगुन तुझ्याकडे बघतो व तु कसा मावळ मध्ये काम करतो ? तुझे सगळे काम मि लगेचच बंद पाडतो व तु कुठे राहतो मला लगेच सांग मी तुझ्या कडे बघतो असे धमकीचे फोन दिनांक २७ मे बुधवार रोजी सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजे पर्यंत येत होते. पोलीसांनी कारवाही न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात पुढे आंदोलन करु अशी मागणी वन्य जीव रक्षक चे निलेश गराडे यांनी पोलिसांकडे केली आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page