नगरपरिषद शाळांचा सामूहिक शिवजयंती उत्सव उत्साहात

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

नगरपरिषद शिक्षण विभागांतर्गत थोर समाजसेवक न. बा. भेगडे पाटील प्राथमिक शाळा क्र .1,2 वीर जिजामाता प्राथमिक कन्याशाळा क्र. ५ व सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्याशाळा क्र. ४ या शाळांचा सामूहिक शिवजयंती उत्सव गुरुवार, दि. १९ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका सौ. शैलजाताई काळोखे होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. सुरेखाताई भेगडे व सौ. सोनालीताई दरेकर उपस्थित होत्या. शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी अनिता वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Advertisement

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यात आले. शाळेच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींनी शिवरायांचा पाळणा, शिवस्तुतीपर गीते व पोवाडे सादर करून वातावरण भारावून टाकले. किल्ल्यांचे व चित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी लोकनृत्यांच्या सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. शाळा क्र. २ च्या उपशिक्षिका अमृता मुखेडकर यांनी मनोगत व्यक्त केले.

इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षा सौ. रश्मी थोरात व इतर सदस्य उपस्थित होते. दिपाली भंडारी यांनी शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकदान करण्याची ग्वाही दिली. प्रशासन अधिकारी अनिता वैद्य यांनी शिवाजी महाराजांचा आत्मविश्वास हा गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारावा, असे आवाहन केले. कार्यक्रमास नगराध्यक्ष मा.संतोष दाभाडे पाटील, नगरसेवक सूरज सातकर, माजी नगरसेवक लक्ष्मण माने, मदन नाटेकर, विनोद भेगडे व उद्योजक संजय बावीस्कर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा क्र.1,2,4,5 चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.सूत्रसंचालन निकिता शितोळे यांनी केले तर आभार सागर सांगळे यांनी मानले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page