शिरगावातील देवळे विद्यालयात कौशल्य मेळावा उत्साहात

SHARE NOW

शिरगाव :

शिरगाव येथील आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालय येथे कौशल्य मेळावा उत्साहात पार पडला. “आधी हाताले चटके, मग मिळते भाकर” या उक्तीची आठवण करून देणारा अनुभव या मेळाव्यात पाहायला मिळाला. विद्यार्थिनींनी चुलीवर भाकऱ्या भाजून त्या विक्रीस ठेवल्या व स्वतःच्या कष्टातून मिळणाऱ्या कमाईचा आनंद अनुभवला.

हा उपक्रम विज्ञान आश्रम, पाबळ व देवळे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार, व्यवहारज्ञान, ग्राहकांशी संवाद आणि नफा-तोटा यांचे प्रत्यक्ष धडे मिळावेत हा या उपक्रमामागील उद्देश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

मेळाव्यात विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ, ज्वेलरी, रंगवलेली मडकी, उलन रांगोळी मॅट, सौंदर्य प्रसाधने तसेच हायड्रोपोनिक शेती यांसारखे विविध स्टॉल उभारले होते. उप्पीट, लस्सी, थालीपीठ, भरीत, पुलाव आदी पदार्थांना उपस्थितांनी पसंती दिली. प्रमुख पाहुण्यांनी स्टॉलना भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पाककलेसोबतच वस्तू निर्मिती, बाजारभाव ठरविणे, ग्राहक सेवा, विक्री कौशल्य आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व समजले. स्वतः चुलीवर भाजलेली भाकरी आणि परिश्रमाचे समाधान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

Advertisement

विज्ञान आश्रमाचे उपसंचालक रणजीत शानभाग यांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या स्वावलंबनासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. विद्यालयातील अनेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असून अशा कौशल्याधारित उपक्रमांमुळे त्यांना नवी दिशा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कौशल्य मेळाव्यास विज्ञान आश्रमाचे उपसंचालक रणजीत शानभाग, फिल्ड ऑफिसर प्रणीत कांबळे, दैनिक लोकमतचे उपसंपादक योगेश्वर माडगुळकर, शिरगावच्या सरपंच पल्लवी गोपाळे, ग्रामपंचायत सदस्य वैशाली गोपाळे, अक्षय गोपाळे, मोहन अरगडे, विजय गोपाळे, साई संस्थानचे विश्वस्त उमेश कविटकर, माजी उपसरपंच धनाजी अरगडे, व्यवस्थापक अनिल देवकर, वरुण जाधव, पत्रकार विलास भेगडे, संतोष थिटे, राधेशाम येणारे, पौर्णिमा कविटकर, नुपूर कविटकर-जोग आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक रमेश फरताडे यांनी केले. नियोजन आयबीटी समन्वयक अर्चना शिंदे, शिक्षिका पूजा कुंभार, अथर्व नाईकनवरे, चैताली गायकवाड यांनी केले. स्टॉलचे परीक्षण मनीषा नाईकवाडे, विलास फड, वरुण जाधव, पौर्णिमा कविटकर यांनी केले.

कार्यक्रमास शारदाश्रमचे मुख्याध्यापक विजय लोखंडे, शिक्षक रामभाऊ घुगे, हनुमान सुरनर, बद्रीनारायण पाटील, किरण धादवड, राधेशाम वारे, साकेत कारंजकर, राहुल होवाळ, विष्णू सानप, बिरू खरात आदींचे सहकार्य लाभले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page