रविंद्र धारणे यांची कल्याण जनता सहकारी बॅंकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड

SHARE NOW

तळेगाव दाभाडे: सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या

दि कल्याण जनता सहकारी बँकेची (मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक) संचालक मंडळ निवडणूक प्रक्रिया नुकतीच

बिनविरोध पार पडली.ही बँक मूळची कल्याण स्थित आहे

या निवडणुकीत पुणे विभागातून श्री रविंद्र धारणे ,रेवा प्रभूदेसाई व सुशीलकुमार मुळ्ये यांची निवड झाली आहे. बँकेच्या अध्यक्षा म्हणून ॲड. संपदा कुळकर्णी, उपाध्यक्ष म्हणून महेश देशपांडे यांची एकमताने निवड झाली आहे. तळेगाव दाभाडे येथील

Advertisement

रवींद्र धारणे हे व्यावसायिकदृष्ट्या कन्सल्टंट आहेत. देश-विदेशातील मोठमोठ्या ब्रँड्सना ते आपली सेवा प्रदान करतात. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे भरीव योगदान आहे. पुणे येथील रेवा प्रभूदेसाई सनदी लेखापाल (सी.ए) आहेत . त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे. चिंचवड येथील सुशीलकुमार मुळ्ये हे यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात. सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात ते सक्रिय आहेत.

दि कल्याण बँकेच्या एकूण ३९ शाखा असून एकूण व्यवसाय ५,३०० कोटींचा आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे ,पिंपरी चिंचवड, तळेगाव दाभाडे, सातारा, कराड कोल्हापूर या भागात बँकेच्या एकूण दहा शाखा आहेत.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page