नाट्य कलाकृतीत तळेगावकर रसिक मंत्रमुग्ध… नाट्य परिषद आयोजित पहिल्याच नाट्यप्रयोगाला रसिकांचा हाऊसफुल प्रतिसाद

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे आयोजित चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकाचा प्रयोग नाट्य रसिकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाला. कै. डॉ . शं. वा. परांजपे नाट्यसंकुल (कलापिनी) तळेगाव दाभाडे येथे सादर झालेल्या या नाट्य प्रयोगात प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालणारी नाटकाची संहिता, नैपथ्य, प्रकाश योजना, संगित आणि रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या कलाकारांचा अभिनय यामुळे हाउसफुल झालेल्या प्रयोगात शेवटपर्यंत एकही प्रेक्षक जागेवरून हालला सुद्धा नाही.

 

आमदार सुनील शेळके यांचे वडील शंकरराव शेळके, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, सचिव संजय वाडेकर, खजिनदार नितीन शहा, प्रमुख कार्यवाह विश्वास देशपांडे, सल्लागार हरिश्चंद्र गडसिंग कलापिनी संस्थेचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, विश्वस्त डॉ अनंत परांजपे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व नटराज पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. तर मध्यंतरात नाटकातील कलाकार वैभव रंधवे, श्रेयस जोशी, समृद्धी कुलकर्णी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Advertisement

यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ अनंत परांजपे यांनी नाट्य परिषदेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करत अशीच दर्जेदार नाटके तळेगावकर रसिकांसाठी यापुढेही आयोजित करावे असे आवाहन केले. तर नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या नाट्यगृह उभारणीच्या प्रकल्पाची माहिती देत लवकरच नाट्यगृहाचे भूमिपूजन होण्याची आशा व्यक्त केली. तसेच हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी मदत करणारे देणगीदार आणि नाट्य रसिकांचे आभार मानत यापुढेही अशाच नवनवीन आणि दर्जेदार कलाकृतीचे रसिकांसाठी आयोजन करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश बारणे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाट्य परिषदेचे विश्वस्त सुरेश साखवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संविद पाटील, उमेश महाजन, तानाजी मराठे, मयूर राजगुरव, दीपक बाळसराफ, सचिन धनवे, प्रकाश चिवटे, प्रकाश भांगरे, संजय मेहता, वैशाली लगाडे, सोनाली पाटील, दाभाडे ताई यांनी अथक परिश्रम घेतले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page