तळेगाव स्टेशन परिसरातील खड्डे न बुजवल्यास ५ ऑक्टोबरला आंदोलन छेडण्याचा निर्धार

SHARE NOW

तळेगाव दाभाडे: तळेगाव स्टेशन परिसरातील सेवाधाम हॉस्पिटल समोरील खड्ड्यांकडे पीडब्ल्यूडी चे जाणीवपूर्वक दुर्लक्ष सुरूच आहे.

या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात आजवर अनेकांचे जीव गेले तरीही संबंधित विभाग बेशुद्धा सारखा बसलेला आहे.

त्यामुळे आता तळेगावकर नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागा ला अल्टिमेटम देत ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११: वाजता स्टेशन भागातील मराठा क्रांती चौकात आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे.

Advertisement

 

सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अच्युत. दिलीप डोळस. कल्पेश भगत. सुनील उर्फ मुन्ना मोरे. प्राध्यापक नितीन फाकटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत मेलद्वारे निवेदनही दिले आहे.

 

या आधी देखील अनेक वेळा तक्रारी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page